Are aliens sending signals to Earth Antarctica Weird Sounds : एलियन हे विश्वासतील सर्वात मोठे रहस्य आहे. एलियन खरचं अस्तित्वात आहेत का? याबाबत नेहमीच वाद विवाद होतात. परग्रहावर एलियनचे अस्तित्व असू शकते असाही दावा केला जातो. पहिल्यांच्या एलियनच्या अस्तित्वाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. अंतराळात नाही तर जमीनीखाली एलियनचे अस्तित्व असू शकते अशा प्रकारची शक्यता आता वर्तवली जात आहे. अंटार्क्टिकामध्ये जमीनीखालून वैज्ञानिकांना रहस्यमयी सिग्नल मिळाले आहेत.
पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. एलियन हे देखील मोठे रहस्. मानले जाते. एलियशी संपर्क झाल्याचा दावा अनके जण करतात. मात्र, प्रत्यक्षात पुरावा कोणीच देऊ शकलेले नाही. अशताच आता अंटार्क्टिकामध्ये काम करणाऱ्या संशोधकांच्या एका पथकाला बर्फाखालून विचित्र रेडिओ सिग्नल मिळाले आहेत. नासाच्या प्रकल्प असलेल्या अंटार्क्टिक इम्पल्सिव्ह ट्रान्झियंट अँटेना (ANITA) वापरून हे सिग्नल कॅप्चर करण्यात आले आहे. हे सिग्न म्हणजे रहस्यमयी ध्वनी लहरी आहेत.
अंटार्क्टिक इम्पल्सिव्ह ट्रान्झियंट अँटेनाला मिळालेले हे रहस्यमयी सिग्नल पाहून शास्त्रज्ञ अचंबित झाले. कारण, हे सिग्नल अवकाशातून नाहीत तर पृथ्वीच्या खालून येत आहेत. शास्त्रज्ञांनी या ध्वनी लहरी न्यूट्रिनो (भूत कण) मुळे निर्माण होण्याची शक्यता नाकारली आहे. कारण, या ध्वनी लहरींचा अर्थ अद्याप उलगडलेला नाही.
अंटार्क्टिक इम्पल्सिव्ह ट्रान्झियंट अँटेनाच्या मदतीने शास्त्रज्ञांनी हा आवाज टिपला आहे. या ध्वनी लहरींची तीव्रता इतकी आहे की हजारो किलोमीटर खडकांमधून गेल्यानंतरही या ध्वनी लहरी पृष्ठभागावर ऐकू येतात.
शास्त्रज्ञांची टीम ANITA कडून मिळालेल्या डेटाची तुलना अंटार्क्टिकामधील आइसक्यूब आणि अर्जेंटिनामधील पियरे ऑगर वेधशाळेतील इतर दोन महत्त्वाच्या न्यूट्रिनो डिटेक्टरमधील माहितीशी करत आहे. परंतु अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही. तथापि, काही शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की हे सिग्नल बर्फ आणि अवकाशाभोवती असलेल्या गडद पदार्थाशी किंवा काही अज्ञात रेडिओ सिग्नलशी संबंधित असू शकतात. अंटार्क्टिक बर्फाखाली काय घडत आहे आणि का घडत आहे हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आणि डेटाची आवश्यकता असेल असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे रहस्यमयी सिग्नल एलियनने पाठवलेले असू शकतात असाही निष्कर्ष काढला जात आहे.