Marathi News> विश्व
Advertisement

NASA ने मातीत पाणी मिसळलं आणि एलियनचा मृत्यू झाला; 50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर नेमकं काय घडलं?

NASA च्या एका चुकीमुळे मंगळ ग्रहावर सापडलेल्या एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊया 50 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?  

NASA ने मातीत पाणी मिसळलं आणि एलियनचा मृत्यू झाला;  50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर नेमकं काय घडलं?

Alien On Mars : एलियन्सच्या अस्तित्वबाबत आजवर अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. मंगळ ग्रहावर एलियन असल्याचा दावे केले जातात. मात्र, खरचं एलियन अस्तित्वात आहेत की नाही? याबाबत कायमच संभ्रम आहे. अशातच 50 वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेबाबात खळबळजनक दावा समोर आला. 50 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक एलियन सापडला होता. मात्र, NASA च्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजन दावा करण्यात आला आहे. बर्लिन टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील एका वैज्ञानिकाने हा दावा केला आहे. 

हे देखील वाचा...  2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी

बर्लिन टेक्निकल युनिव्हर्सिटीचे डर्क शुल्झे-माकुच यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेताना NASA या अंतराळ संस्थेने  एक प्रयोग केला होता. या प्रयोगादरम्यानच एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा  डर्क शुल्झे-माकुच यांनी केला आहे. NASA च्या प्रयोगाबाबतची सविस्तर माहिती डर्क शुल्झे-माकुच यांनी  दिली. तसेच  NASA च्या चुकीमुळे कशा प्रकारे एलियनचा मृत्यू झाला हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल

1970 साला दरम्यान नासाने मंगळ ग्रहावर वायकिंग मिशन राबवले होते. नासाच्या वायकिंग मोहिमेअंतर्गत दोन लँडर मंगळ ग्रहावर उतरले होते.  20 जुलै 1976 रोजी वायकिंग 1 तर,  3 सप्टेंबर 1976 रोजी वायकिंग 2 हे मंगळावर उतरले होते. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या उद्देशानेच नासाने वायकिंग मिशन राबवले. या प्रयोगाचा एक भाग म्हणून मंगळावरील मातीत पाणी मिसळण्यात आले. तसेच कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूच्या मदतीने देखील मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे देखील वाचा... UFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!

मंगळ ग्रहावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. येथील एलियन हे पाण्याशिवाय जिवंत राहत होते. नासाच्या  प्रयोगादरम्यान मंगळ ग्रहावर  कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूचे रिएक्शन होवून hitch-hikers च्या संसर्गामुळे  एलियनचा मृत्यू झाल्याचा दावा डर्क शुल्झे-माकुच यांनी केला आहे.  वायकिंग 1 आणि  वायकिंग 2 हे सध्या सक्रिय नाहीत. मात्र, त्यांचे अवशेष मंगळ ग्रहावर आहेत. 

मंगळ ग्रहावर जगण्यासाठी पाण्याची गरज नाही असा एक निष्कर्ष काढला जात आहे.  चिलीच्या अटाकामा वाळवंटात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांप्रमाणेच मंगळग्रहावर सजीवाचे अस्तित्व आहे. नासाच्या वायकिंग लँडरने चुकून मंगळावर जास्त पाणी टाकून जीवसृष्टी नष्ट केल्याचा दावा केला जात आहे.  

Read More