USA Donald Trump Barak Obama : आयात शुक्लासंदर्भातील निर्णयानं संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात अनेकांनाच पेचात पाडलं आहे. कारण ठरतंय ते म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ, जिथं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एफबीआयकडून अटक केलं जात असल्याचं आणि ते कारागृहात असल्याचं पाहायला मिळत आहे.
कायद्यापुढं आणि कायद्याहून मोठं कोणीही नाही, अशा कॅप्शनसह त्यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानं एकाएकी अनेकांच्याच भुवया उंचावल्या. मात्र हा व्हिडीओ AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. मात्र कायदा राष्ट्राध्यक्षांहून मोठा आहे या त्यांच्या शब्दांवरच नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या.
ट्रम्प यांनी Truth नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ओबामा चक्क कारागृहात असल्याचंही दाखवण्यात आलं. एफबीआयचे काही अधिकारी ट्रम्प यांच्यासमोरच बराक ओबामा यांना अटक करतात आणि त्यांना कारावासाची शिक्षा होते असं पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडीओ AI Based असल्याचच स्पष्ट होत आहे.
कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी हा असा व्हिडीओ शेअर करणं हे बेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचच मत काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हल्लीच ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्यावर निवडणूक प्रक्रियेमध्ये फसवेगिरी केल्य़ाचे गंभीर आरोप लावल्यानंतरच हा व्हिडीओ पोस्ट केल्यानं नेटकऱ्यांचीसुद्धा दिशाभूल झाली.