US China Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (DONALD TRUMP) डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्कासंदर्भातील निर्णयाची घोषणा केल्या क्षणापासून जगभरातील अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे परिणाम दिसून आले. तिथं अनेक देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं, तर दुसरीकडे चीननं मात्र अखेरच्या क्षणापर्यंत या धोरणाशी लढा देण्याची तयारी दाखवली. याच भूमिकेनंतर पुन्हा एकदा चीनवरील Tariff मध्ये वाढ करत हा कर 84 टक्क्यांवरून 125 टक्के इतका केला आणि चीनला आणखी एक दणका दिला.
अमेरिका आणि चीन यांच्यात हे व्यापारयुद्धा आणखी तीव्र होत असतानाच ट्रम्प सरकारनं जगभरातील देशांची केलेली ही कोंडी दूर करण्यासाठी आता चीननंही कंबर कसल्याचं स्पष्ट होत आहे. भारतानं आप्लाला साध देत या प्रसंगी एकमेकांसोबत राहून या परिस्थितीला सामोरं जावं अशीच अपेक्षा चीननं व्यक्त केली आहे.
भारतात असणाऱ्या चीनच्या दूतावासातील प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एका पोस्टच्या माध्यमातून ही बाब समोर आली असून, यू जिंग यांनी X च्या माध्यमातून ही पोस्ट केली. जिथं त्यांनी लिहिलं, 'चीन-भारत हे दोन्ही देश आर्थिक आणि व्यापारी संबंधांच्या दृष्टीकोनातून परस्परांकडून होणाऱ्या नफ्यावर अवलंबून आहेत. अमेरिकेकडून आयात शुल्कासंबंधी अटीचा दुरूपयोग केला जात आहे. अशा स्थितीत दोन सर्वात मोठ्या विकसनशील देशांनी या आव्हानात्मक प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.'
चीन हा आर्थिक जागतिकीकरण आणि बहुपक्षीयतेचा पुरस्कर्ता असून, त्याचा जागतिक अर्थसत्तेवरही मोठा प्रभाव पाहायला मिळतो. जिथं चीन जागतिक स्तरावरील आर्थिक सुबत्तेमध्ये सरासरी 30 टक्क्यांचं योगदान देतो, असं म्हणत ही बहुपक्षीय व्यापारप्रणाली सुरक्षितरित्या कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
China's economy is underpinned by a system that ensures steady growth, and produces positive spillovers. Chinese manufacturing is built on a complete and continually upgrading industrial system, sustained investment in R&D, and a strong focus on innovation.
— Yu Jing (@ChinaSpox_India) April 8, 2025
China is a firm… pic.twitter.com/w3QuSCingL
'ट्रेड' आणि 'टॅरिफ'च्या या युद्धात कोणीहीविजेता नसून, सर्व देशांनी त्यांच्या नैतिक मुल्यांना अनुसरून यामध्ये सहभागी होत व्यापार करवा आणि जिथंजिथं एकत्रित व्यापारीकरणाला विरोध होणारी धोरणं असतील त्याचा संघटितरित्या विरोध करावा, अशी ठाम भूमिका चीनच्या वतीनं यू जिंग यांनी मांडली.
एकिकडे चीन आपल्या निर्णयावर ठाम असतानाच दुसरीकडे जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे स्पष्ट संकेत पाहता बुधवारी ट्रम्प सरकारनं एकाएकी नमती भूमिका घेत बहुतांश देशांसाठी लागू केलेलं आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. चीनच्या बाबतीत मात्र अमेरिकेच्या भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही. त्यामुळं आता या व्यापारयुद्धाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.