Marathi News> विश्व
Advertisement

Aurangzeb: 'या' देशातील लोक औरंगजेबला आदर्श मानतात; देशाचे नाव आणि कारण जाणून भारतीयांचा संताप होईल

औरंगजेबाच्या अमानुष, अनन्वित अत्याचाराच्या खुणा इतिहासात आहेत. भारतातील या क्रूर शासकाला या देशातील लोक आदर्श मानतात. 

Aurangzeb:  'या' देशातील लोक औरंगजेबला आदर्श मानतात; देशाचे नाव आणि कारण जाणून भारतीयांचा संताप होईल

Aurangzeb History : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशलाी इतिहास छावा (Chhava) या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. शंभूराजांच्या ज्वलंत इतिहासावर आधारीत असलेल्या छावा सिनेमाला देशभर तुफान हिट झाला आहे. छावा चित्रपटासह चर्चेत आला आहे तो क्रूर मुघल शासक औरंगजेब. महाराष्ट्रात औरंगजेब वरुन मोठे राजकारण रंगले आहे. औरंगबजे क्रूर नव्हता असं वादग्रस्त  विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. यावरुन चांगलाच वाद झाला. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं अबू आझमींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भारतीय औरंगजेबला अत्यंत क्रूर समजत असले तरी एक असा देश आहे जेथील लोक औरंगजेबला आपला आदर्श मानतात.

भारतात लोक औरंगजेबाला एक क्रूर आणि धर्मांध शासक मानतात. औरंगजेबने मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदूंवर अत्याचार केले, म्हणून त्याची प्रतिमा येथे नकारात्मक आहे. औरंगजेबाने त्याचे वडील शाहजहान यांना कैद केले. भाऊ दारा शिकोह याची हत्या केली. औरंगजेबने बादशाहचा ताज वडिलांकडून हिसकावून घेतला. यामुळेच औरंगजेब हा सत्तेचा लोभी आणि भारतातील सर्वात निर्दयी राजा म्हणून ओळखला जाऊ लागला.

भारतात ज्याची प्रतिमा अत्यंत मलिन आणि क्रूर आहे असा हा औरंगजेब पाकिस्तानमध्ये एक आदर्श शासक मानला जातो. पाकिस्तानातील अनेक लोक त्याची पूजा करतात.  कारण त्याने आपला धर्म इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ मानला असे येथील लोकांना वाटते. यामुळेच औरंगजेब यांच्यासाठी आदर्श राजा आहे.  पाकिस्तानचे कट्टरपंथी औरंगजेबाच्या इस्लामिक धोरणांचे कौतुक करतात. औरंगजेबने शरियाची कडक अंमलबजावणी करून इस्लामची सेवा केली असा  त्यांचा विश्वास आहे.

औरंगजेबाने त्याच्या राजवटीत धार्मिक तत्त्वे बळकट केली. ही  चांगल्या शासकाची लक्षण मानली जातात असं पाकिस्तानमधील औरंगजेब समर्थकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमध्ये औरंगजेबला इस्लामचा रक्षक म्हणून मोठा आदर दिला जातो. भारतातील हा क्रूर शासक पाकिस्तानात मोठा आदर्श मानला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.  

Read More