Australia is the world’s smallest continent : पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक अशी या सात खंडाची नावे आहेत. मात्र, सात खंडापैकी एकाला आपण एक देश समजतो. यामुळे हा देश आणि की खंड असा प्रश्न पडतो. 99 टक्के लोक याचे उत्तर देताना कन्फ्युज होतात. जाणून घेऊया कोणता खंड जगभरात देश म्हणून ओळखला जातो.
आशिया हा पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड ( Largest Continent ) आहे. 4 कोटी 40 लाख चौरस किलोमीटर हा खंड पसरलेला आहे. आफ्रिका हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. आफ्रिकेनंतर दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो.
आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक अशी या सात खंडापैकी ऑस्ट्रेलिया खंड हा ऑस्ट्रेलिया देश म्हणून ओळखला जातो. कांगारु या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेला ऑस्ट्रेलिया हा जगातील लोकप्रिय देश आहे.
ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट, हिंदी महासागर तसेच पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. ऑस्ट्रेलिया हा जगातील सहाव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 7,686,850 चौरस किलोमीटर म्हणेजेच 2,967,910 चौरस मैल) इतके आहे. लॉर्ड हो आयलॅंड आणि मॅकक्वेरी आयलॅंडसह हे संमिश्र अमेरिकेच्या 48 राज्यांपेक्षा किंचित लहान आणि 1.5 पट मोठे आहे.सिडनी ही
ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. यासह मेलबर्न, कॅनबेरा, ॲडलेड/ऍडलेड, ब्रिस्बेन, गोल्डकोस्ट, पर्थ, डार्विन आणि होबार्ट ही ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय शहरं आहेत. ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वांत सुंदर देशांपैकी एक आहे. येथील सुंदर निसर्ग आणि वेगळी संस्कृती खास वैशिष्ट आहे. समुद्री बेटं, भूप्रदेश आणि वाळवंटात पसरलेल्या या देशात घनदाट वनेही तेवढीच सुंदर आहेत. विविध वन्यजीव आणि वनस्पती येथे पाहायला मिळतात. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हे जगभरातील पर्यटांच्या बकेट लिस्टमध्ये असलेले आवडते ठिकाण आहे.