Baba Vanga And Nostradamus 2025 Predictions : 2025 ची सुरुवात महाभयंकर असेल अशी धडकी भरवणारी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती. नास्त्रेदमसने 2025 या वर्षासाठी अत्यंत धोकादायक भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस दोघांची भयानक भविष्यवाणी जशीच्या तशी खरी ठरल्याचे दिसत आहे. संपूर्ण जगाला ज्याची भिती होती तेचं घडलं आहे. 2025 मध्ये तिसरे महायुद्ध सुरु झाल्याचे संकेत मिळत आहे. याला कारण ठरले आहे ते इराण आणि इस्रायल यांच्यात पेटलेला संघर्ष.
इराण आणि इस्रायलचं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होतांना दिसतेय. दरम्यान या युद्धात अमेरिकेची एन्ट्री झाल्यानंतर जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? अशी चर्चा आता सुरू झालीय. अमेरिकेनं या युद्धात इस्त्रायलला साथ देत इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. अमेरिकेनं आपलं सर्वात ताकदवान बी-2 या बॉम्बरनं इस्त्रायलवर हल्ला केला आहे.
मध्य पूर्वेत युद्ध भडकण्याचा धोका आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अनेक देश भडकले आहेत. या देशांमध्ये रशिया, चीन, उत्तर कोरिया सारख्या देशांचा समावेश आहे. या देशांनी आधीच इशारा दिला होता की जर अमेरिका इस्रायल-इराण युद्धात सामील झाली तर परिस्थिती आणखी बिकट होईल. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वाढली आहे. अशातच बाबा वेंगाची भिष्यवाणी चर्चेत आली आहे.
2025 मध्ये तिसरे महायुद्ध होईल असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. 2025 मध्ये जगाचा अंत सुरू होईल. 2025 मध्ये युरोपमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होईल, ज्यामुळे खंडातील लोकसंख्येत मोठी घट होईल असे बाबा वेंगाचे भाकित आहे. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिका सामील झाल्यानंतर आणि रशिया आणि चीन या दोन महासत्ता इराणमध्ये सामील झाल्यानंतर, बाबा वेंगाने केलेली तिसरे महायुद्ध घडवण्याची भविष्यवाणी खरी ठरल्याने लोक घाबरले आहेत. जर तिसरे महायुद्ध झाले तर जगात भयानक विनाश होईल.
नास्त्रेदमसने 2025 या वर्षासाठी धोकादायक भविष्यवाणी केली आहे. ब्राझीलमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होईल. तसेच विनाशकारी पूराचे भाकीत नास्त्रेदमसने वर्तवले आहे. नास्त्रेदमसची भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय. अशातच आता नास्त्रेदमसने तिसऱ्या महायुद्धाबाबत केलेली भविष्यवाणी देखील खरी ठरत असल्याचे दिसत आहे.