Marathi News> विश्व
Advertisement

बाबा वेंगाच्या 'या' 5 धक्कादायक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या! जे भाकित वर्तवले अगदी तसचं घडलं

बाबा वेंगाी भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. जाणून घेऊया बाबा वेंगाच्या 5 धक्कादायक भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्या आहेत.  जे भाकित वर्तवले अगदी तसचं घडलं आहे. 

 बाबा वेंगाच्या 'या' 5 धक्कादायक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या! जे भाकित वर्तवले अगदी तसचं घडलं

Baba Vanga Predictions 2025: प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते.  बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली आहे. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते. बाबा वेंगाच्या  5 धक्कादायक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.  जे भाकित वर्तवले अगदी तसचं घडलं आहे. 

नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्यात. विशेष म्हणजे ही भाकितं कुठेही लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. त्यांचे काही आडाखे खरे ठरले, तर काही चुकीचे निघालेत. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट, अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आफ्रिकन अमेरिकन बराक ओबामा यांची निवड, चेरनोबिल आपत्ती आणि राजकुमारी डायनाच्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली. 

डिजिटल क्रांती आणि एआय 

बाबा वेंगाने आपत्तीपासून ते तांत्रिक विज्ञानातील विकासापर्यंत अनेक भाकीत वर्तवली आहेत.  डिजिटल क्रांती आणि एआयच्या जगात सायबर गुन्हे ही एक मोठी समस्या निर्माण होईल हे भाकित बाबा वेंगाने केले होते.  भविष्यात इंटरनेटचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी आणि सुरक्षेला हानी पोहोचवण्यासाठी केला जाईल अशी भिती वक्त केली जात आहे. 

जागतिक आर्थिक अस्थिरता

जागत आर्थिक अस्थिरता निर्माण होईल असे भाकित बाबा वेंगाने केले होते.  जगाला अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांमधून जावे लागेल. आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेलाही याचा फटका बसेल. तिथे विकासाचा वेग मंदावेल. अमेरिकेप्रमाणे, उत्पादकता कमी झाल्यामुळे ब्रिटनलाही वाढत्या व्याजदरांना सामोरे जावे लागेल. 

दहशतवाद

एक मोठा देश जैविक युद्धात सहभागी होईल अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली होती.  युक्रेन-रशिया आणि इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात हा मुद्दा तापला आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील मोठी कामगिरी

बाबा वेंगा यांनी वैद्यकीय क्षेत्राबद्दल केलेल्या भाकिते एका मोठ्या यशाकडे निर्देश करतात. त्यांनी भाकीत केले होते की 2024 मध्ये अल्झायमर आणि कर्करोगावर उपचार सापडतील. भारताने या वर्षी स्वतःचा एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस) विकसित केला आहे, जो अकाली मृत्यू रोखण्यास मदत करेल. 

हवामान बदल

बाबा वांगा याने  हवामान बदलावर भाकित केले होते.  अति प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांच्या अपव्ययामुळे जगाला हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. सायन्स अ‍ॅडव्हान्सेसमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जागतिक उष्णतेच्या लाटा 67 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्यामुळे येत्या काळात समुद्राजवळ बांधलेली शहरे पूर्णपणे पाण्यात बुडातील अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. 
 

Read More