Baba Vanga Shocking Predictions: प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याची भविष्यवाणी नेहमी चर्चेत असते. बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केलीय. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते. अशात बाबा वेंगाची आजपर्यंतची सर्वात भयानक भविष्यवाणी चर्चेत आली आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे जीव धोक्यात आहे अशी ही भविष्यवाणी आहे.
बाबा वेंगाची ही भविष्यवाणी फोनशी निगडीत आहे. आपल्या खिशातील फोन एके दिवशी जीवनासाठी सर्वात मोठा धोका ठरणार आहे. बाबा वेंगाने मोबाईल फोनच्या धोक्याची भविष्याचे भाकित आधीच वर्तवले होते. बाबा वेंगाने अनेक घटनांचे भाकीत आधीच केले आहे. बाबा वेंगाने भाकित केलेल्या 9/11 हल्ला, भूकंप, त्सुनामी यासारख्या घटना प्रत्यक्षात घडल्या. मोबाईल फोन आणि स्क्रीनशी संबंधित बाबा वेंगाने भयानक भाकित केले आहे.
मानव लहान पेट्यांमध्ये गुंतेल. या लहान पेट्याच मानवाच्या जीवावर बेततील असे भाकित बाबा वेंगाने केले होते. या लहान पेट्या म्हणजे मोबाईल आहेत. आज, मुलांपासून वृद्धांपर्यंत, सर्वजण मोबाईल स्क्रीनमध्ये बुडालेले आहेत. मानवी आरोग्यावर मोबाईल फोन वापराचे भयानक परिणाम होत आहेत. भविष्यात मोबाईच्या अती वापरामुळे जीव धोक्यात येवू शकतो असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे.
भारतातील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (NCPCR) अहवालानुसार, जगातील सुमारे 24 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन पाहतात आणि सुमारे 37 टक्के मुले जास्त प्रमाणात मोबाईल स्क्रीनजवळ राहत असल्याने त्यांच्या अभ्यासावर किंवा कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अनेक डॉक्टर आता याला "डिजिटल आजार" म्हणू लागले आहेत. लहान मुलचं नाही तर वृद्ध देखील तासनतास फोन स्क्रीन स्क्रोल करतात. यामुळे पाठदुखी, डोळ्यांची जळजळ आणि मानसिक ताण यासारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.