Marathi News> विश्व
Advertisement

अस्वलाच्या पिल्लाचा जबरदस्त डान्स, स्टेप्स पाहून नेटकरी म्हणाले, क्या बात है!

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यात सर्वाधिक पसंती ही प्राण्यांच्या व्हिडीओंना असते.

अस्वलाच्या पिल्लाचा जबरदस्त डान्स, स्टेप्स पाहून नेटकरी म्हणाले, क्या बात है!

मुंबई: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यात सर्वाधिक पसंती ही प्राण्यांच्या व्हिडीओंना असते. त्यांच्या हरकती पाहून आनंद मिळत असल्याने वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला जातो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एका अस्वलाच्या पिल्लाने जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. 

ट्विटरवर शेअर केलेल्या या 13 सेकंदाच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून पसंती मिळत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. इतकेच नाही तर नेटकरी व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत. अशाप्रकारे प्राण्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात टिपणे खरोखरच खूप अवघड काम आहे. एवढेच नाही तर कधी कधी हे क्षण टिपण्यासाठी कॅमेरामनला अनेक दिवस वाट पहावी लागते.

अस्वलाच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत आहेत. 

Read More