Marathi News> विश्व
Advertisement

आए हो मेरी जिंदगी मे... पाहा मैलो दूर असणाऱ्या 'चाचां'नी बेन्जोवर वाजवलंय अफलातून गाणं

गाणं ऐकून तुम्हालाही आठवेल 'राजा हिंदुस्तानी'

आए हो मेरी जिंदगी मे... पाहा मैलो दूर असणाऱ्या 'चाचां'नी बेन्जोवर वाजवलंय अफलातून गाणं

नवी दिल्ली : असं म्हणतात की तुम्हाला कोणती कला अवगत असेल तर ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितून तारते. त्याचप्रमाणे कलेला भेदभाव कळत नाही, कलेला देशांमध्ये असणाऱ्या सीमा कळत नाहीत. अतिशय निस्सिम असाच हा भाव. दूरवरच्या कोणा एका व्यक्तीला आपल्या देशाशी, आपल्या चित्रपटांशी आणि अखेर आपल्या माणसांना जोडणारा एक दुवा. 

कलेचा असाच एक सुरेख नजराणा तुमच्याआमच्यापासून दूर असणाऱ्या एका काकांनी, 'चाचां'नी केला आहे. 

आमिर खान, करिष्मा कपूर यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'आए हो मेरी जिंदगी मे तुम बहार बनके' हे गाणं या चाचांनी वाजवलं आहे. 

पाकिस्तानातील बलोचिस्तान प्रांतात बेन्जो वाजवणाऱ्या या चाचांना काय ठाऊक की त्यांच्या का कलेनं कित्येच्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे. 

अगदी नि:स्वार्थ भावनेने त्यांनी हे वाद्य वाजवलं आणि दनियाल अहमद यांनी त्यांचा हा व्हिडीओ साऱ्या जगाच्या भेटीला आणला. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमधून या चाचांची ओळख समोर आली आहे. 

उस्ताद नूर बक्श असं या वयोवृद्ध व्यक्तीचं नाव. ते बलोची बेन्जो इतक्या सुरेख पद्धतीने वाजवतात, की ऐकतच रहावसं वाटतं.

तुमचं या व्हिडीओबाबत काय मत? तुम्ही पाहिलाय असा कोणी कलाकार? 

Read More