Marathi News> विश्व
Advertisement

बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर विमान कोसळलं; 16 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि पायलट ठार

बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 प्रशिक्षण विमान आज दुपारी 1.30 वाजता राजधानी ढाक्यातील उत्तरा भागातील दियाबारी भागात कोसळले. हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा कॅम्पसजवळ कोसळले. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत 16 विद्यार्थी 2 शिक्षक आणि एक पायलटचा मृत्यू झाला आहे. 

बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर विमान कोसळलं; 16 विद्यार्थी, 2 शिक्षक आणि पायलट ठार

बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 प्रशिक्षण विमान आज दुपारी 1.30 वाजता राजधानी ढाक्यातील उत्तरा भागातील दियाबारी भागात कोसळले. हे विमान माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा कॅम्पसजवळ कोसळले. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर शाळा आणि आसपासच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. दुर्घटनेनंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये शाळकरी विद्यार्थी आणि लोक आपले जीव वाचवून सैरभैर पळताना दिसत आहेत. या दुर्घटनेत 16 विद्यार्थी 2 शिक्षक आणि एक पायलटचा मृत्यू झाला आहे. 

हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. तसंच दुर्घटनेच्या कारणांची माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एफ 7 हे एक चायनीज विमान आहे. 

एकाचा मृत्यू

AP रिपोर्टनुसार, लष्कर आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, बांगलादेश हवाई दलाचं ट्रेनर विमान ढाकाच्या उत्तर भागात एका शाळेच्या परिसरात दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. 
 
दुर्घटनेची माहिती मिळताच बांगलादेश लष्कराचे जवान आणि अग्निदमन दल, नागरी सुरक्षेची आठ पथकं घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्यास सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, त्यांना दुपारी 1.18 च्या सुमारास माइलस्टोन कॉलेजजवळ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली. यानंतर तीन पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. इतर पथकं रस्त्यावर तयारीत आहेत. 

Read More