Marathi News> विश्व
Advertisement

काय ही विचित्र प्रथा? 'इथं' वडिलच करतात मुलीशी लग्न, कारण एकच....

Wedding Rituals : जगाच्या पाठीवर लग्न अर्थात विवाहसंस्थेशी संबंधित अशा अनेक प्रथा आहेत ज्या सहसा पचनी पडणं कठीणच... या देशातील प्रथेविषयी वाचून हैराण व्हाल   

काय ही विचित्र प्रथा? 'इथं' वडिलच करतात मुलीशी लग्न, कारण एकच....

Wedding Rituals : जगाच्या पाठीवर असणाऱ्या प्रत्येक देशात स्थानिक समुदायांचा वावर पाहायला मिळतो. काही समुदाय असे असतात, ज्या अनेकदा त्या त्या देशामध्ये, प्रांतामध्ये कैक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. याच समुदायांमधील चालीरिती आणि त्यांच्या रुढीपरंपरासुद्धा तितक्याच वेगळ्या. अनेकदा तर पचनी न पडणाऱ्या. 

भारताशेजारील राष्ट्रात एक अनपेक्षित प्रथा... 
काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील मंडी समुदायात एक डोकं चक्रावणारी प्रथा- परंपरा रुजू असून, त्यानुसार वडिलच त्यांच्या वयात आलेल्या मुशीली लग्न करू शकतात. या लग्नासाठी काही अटी असतात. 

मंडी समुदायामध्ये एखाद्या पुरुषानं वयानं कमी असणाऱ्या मुलीशी किंवा विधवेशी लग्न केल्यास तो पुढे आपल्या मुलीशी लग्न करणार हे स्पष्ट होतं. पण, ती मुलगी या पुरुषाची आणि लग्न केलेल्या त्या महिलेच्या नात्यातून झालेली मुलगी नसून पहिल्या लग्नातून झालेली त्याच महिलेची सावत्र मुलगी असेल. 

भविष्याच्या विचारानंच... 

आई आणि मुलीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतूनं आणि या पुरुषांकडून त्यांची काळजी घेतली जाण्याच्या, सांभाळ करण्याच्या हेतूनं हे लग्न केलं जातं. या कुप्रथेमध्ये सावत्र मुलीचा पती होण्यासोबतच पुरुषाला तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची परवानगीसुद्धा मिळते. बांगलादेशमध्ये या कुप्रथेची अनेकांनीच निंदा केली असतानाच मंडी समुदायात मात्र या प्रथेला मिळालेली जागा वादाचा विषय ठरत आहे. 

हेसुद्धा वाचा : ठाऊक नाही, 13 वं मूल माझं आहे की...; म्हणूनही मस्क या तरुणीला देत आहेत 25 लाख डॉलर

जागतिक स्तरावर फक्त बांगलादेशच नव्हे, तर अनेक देशांमध्ये अनेक असे समुदाय आहेत जिथं विवाहसंस्थेशी संबंधिक अनेक प्रथा आणि कुप्रथा आजही प्रचलित आहेत. जग अतिशय झपाट्यानं प्रगतीच्या वाटेवर चालत असतानाच या देशांमधील निंदनीय कुप्रथा नेमक्या कथी थांबणार हाच प्रश्न सातत्यानं सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती विचारताना दिसत आहेत. 

Read More