Marathi News> विश्व
Advertisement

Sheikh Hasina Networth: वर्षाला 9,92,922 पगार, 6 एकर जमीन, लाखोंच्या मुदत व ठेवी; शेख हसीना यांची संपत्ती किती?

Sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशात आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला असून सर्व सामान लुटत आहेत.   

Sheikh Hasina Networth: वर्षाला 9,92,922 पगार, 6 एकर जमीन, लाखोंच्या मुदत व ठेवी; शेख हसीना यांची संपत्ती किती?

Sheikh Hasina Networth: बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला असून, अराजकता निर्माण झाली आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी याआधीच देश सोडला होता. लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून त्यांनी थेट भारत गाठला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामाही दिला आहे. लष्कराने शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि देश सोडण्यासाठी 45 मिनिटांचा अल्टिमेटम दिला होता. 

शेख हसीना यांच्या घरी काम करणारा नोकरही अब्जाधीश झाल्याचा दावा करण्यात आला आला होता. तो आता अमेरिकेत वास्तव्यास असून त्याच्याकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आहे असाही दावा आहे. याची जगभरात चर्चा झाली. शेख हसीना यांची गणना जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये केली जाते. दरम्यान शेख हसीन यांच्याडे किती संपत्ती आहे हे जाणून घ्या.

शेख हसीना यांच्याकडे किती संपत्ती?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा विराजमान झाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष बांगलादेश अवामी लीगने 300 पैकी 288 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शेख हसीना यांचा हा पंतप्रधान म्हणून चौथा कार्यकाळ होता. या विजयानंतर शेख हसीना यांनी हा आपला शेवटचा कार्यकाळ असेल असं सांगितलं होतं. बांगलादेशात त्यांच्याविरोधात वाढणाऱ्या संतापाची जाणीव बहुतेक त्यांना झाली होती. त्यांच्यावर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप होत होते.  
 
शेख हसीना यांच्या संपत्तीतबद्दल बोलायचं गेल्यास त्यांना दरवर्षी 9,92,922.00 रुपये पगाराच्या रुपात मिळतात. त्यांना महिन्याचा पगार 86 हजार रुपये होता. मात्र, याशिवाय त्याच्याकडे उत्पन्नाचे इतरही अनेक स्रोत आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान शेख हसीना यांची एकूण संपत्ती 4 कोटी 36 लाख रुपये आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये त्यांनी 1 कोटी 7 लाख रुपये कमावले होते आणि त्यातील महत्त्वपूर्ण हिस्सा कृषी क्षेत्रातून येतो.

2018 च्या तुलनेत त्यांचे कृषी उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे. शेख हसीना यांच्या आयकर रिटर्ननुसार त्यांचे उत्पन्न 1 कोटी 91 लाख रुपये आहे. त्याचे विविध 'सेक्युरिटीज'चे उत्पन्नही वाढले. या स्थितीत त्याचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी एकूण 75 लाख रुपयांचे मुदत ठेवी आणि बचत रोखे खरेदी केल्याचेही त्यांनी सांगितले.

6 एकर जमिनीच्या मालकीण

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावावर 6 एकर शेतजमीन आहे. तसंच त्या मासेमारीतूनही कमाई करतात. त्याच्यांकडे दान करण्यात आलेली एक कारही आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं गेल्यास त्या बीए आहेत. 

शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. शेख हसीना यांचं 1968 मध्ये एम.ए. वाजेद मिया यांच्याशी लग्न झालं.  2009 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झाले. विद्यार्थी जीवनात, त्या ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातही सक्रिय होत्या, त्यानंतर त्यांनी वर्षानुवर्षे पंतप्रधानपद भूषवलं.

Read More