Marathi News> विश्व
Advertisement

GK : जगातील एकमेव एअरपोर्ट इथं उतरताच प्रवासी तीन मोठ्या देशात पोहचतात; इथं दोन देशांचे कायदे लागू होतात

Amazing Airport In The World: जगात एक असं एअरपोर्ट आहे तिथे उतरल्यावर प्रवासी तीन देशात पोहचतात. या विमानतळावर दोन देशांचे कायदे लागू होतात. 

GK : जगातील एकमेव एअरपोर्ट इथं उतरताच प्रवासी तीन मोठ्या देशात पोहचतात; इथं दोन देशांचे कायदे लागू होतात

Basel-Mulhouse-Freiburg Airport Most Amazing Airport In The World: जगात असे अनोखे एअरपोर्ट आहे जिथे उतरताच प्रवाशी जगातील तीन मोठ्या देशात जाऊन जाऊ शकतात. या विमानतळावर तीन देशांचे प्रवेशद्वार पाहून प्रवासी गोंधळतात.विशेष म्हणजे या विमानतळावर  दोन देशांचे कायदे लागू होतात.  बासेल-मुलहाऊस-फ्रीबर्ग  असे या  विमानतळाचे नाव (Basel-Mulhouse-Freiburg Airport) आहे. 

हे विमानतळ फ्रान्समध्ये आहे. या विमानतळाच्या भौगोलिक स्थानामुळे हे खास आणि वेगळे ठरते. स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या तीन देशांसाठी हे एक महत्त्वाचे विमानतळ आहे. या विमानतळावरील एका एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यास प्रवाशी स्वित्झर्लंडमध्ये पोहचतात. जर प्रवासी दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले तर ते  थेट फ्रान्समध्ये पोहचतात. एवढेच नाही या विमातळावरुन जर्मनी देशात पोहचता येते. या विमानतळावरुन तीन देशांमध्ये प्रवेश करता येऊ शकतो. 

विमानतळाची सुरक्षा प्रामुख्याने फ्रेंच सुरक्षा एजन्सींकडून हाताळली जाते. या विमानतळार स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशाचे कस्टम झोन एकाच छताखाली आहेत. यामुळेच बासेल-मुलहाऊस-फ्रीबर्ग विमानतळावर  स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या दोन देशांचे कायदे लागू होतात.

येथे प्रवाशांना युरो आणि स्विस फ्रँक या दोन वेगवेगळ्या चलनांचा वापर करण्याची सुविधा मिळते. याचा अर्थ स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करणारे प्रवासी स्विस फ्रँकमध्ये पैसे देऊ शकतात, तर फ्रान्समध्ये जाणारे प्रवासी युरोमध्ये पैसे देऊ शकतात.
 फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन देशातील संबध सुधारण्यासाठी सन 1930 हे विमानतळ बांधण्याची योजना आखण्यात आली. दुसऱ्या महायुद्धामुळे त्याचे बांधकाम थांबवण्यात आले. मात्र, 1946  नंतर या विमानतळाचे बांधकाम पुन्हा सुरु करुन पूर्णत्वास नेण्यात आले.  युद्धानंतर हे विमानतळ दोन देशांमधील सहकार्याचे प्रतीक बनले.

हे विमानतळ उभारण्यासाठी फ्रान्सने आपली जमीन दिली, तर स्वित्झर्लंडने अतिरिक्त निधी दिला. हे विमानतळ तीन देशांना जोडते - फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंड - आणि तीन प्रमुख शहरांना सेवा देते.  फ्रीबर्ग अॅम ब्रेसगौ (जर्मनी), मुलहाऊस (फ्रान्स) आणि बासेल (स्वित्झर्लंड) असं या विमानतळाचे नाव ठेवण्यात आले आहे. या विमानतळाच्या कामकाजात तिन्ही देशांचे सल्लागार सहभागी होतात. 

Read More