Marathi News> विश्व
Advertisement

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच ! शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही

'वर्क फ्रॉम होम' करताना शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं पण आता...

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच ! शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही

Right to Disconnect : कोरोनाची लाट आली आणि अनेकाचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. मात्र घरातून काम करताना अनेकदा बॉसचा फोन आल्यानं शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं. जवळजवळ सगळ्याच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था. 

बॉसच्या सततचा फोन आणि मेसेजमुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्यांना आता राईट टू डिस्कनेटचा (Right to Disconnect) अधिकार मिळाला आहे. याचाच अर्थ शिफ्ट संपली असेल तर बॉसच्या कोणत्याही फोनला किंवा मेसेजला उत्तर देणं कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असणार नाही. मात्र हा नियम भारतात नव्हे तर बेल्जियममध्ये (Belgiam) लागू झाला आहे. 
 
'बॉस'गिरी फक्त ऑफिसातच
या नियमाअंतर्गत आता बॉस शिफ्ट संपलेल्या कर्मचाऱ्यांना कॉल किंवा मेसेज करु शकणार नाहीत. महत्वाची घटना असेल तरच कॉल करु शकतात. पण यासाठी बॉसला स्पष्टीकरणही द्याव लागेल. डॉक्टर, सैन्य, पोलीस इत्यादी आपत्कालीन सेवांमध्ये हा नियम कोणत्याही देशात लागू करण्यात आलेला नाही. 

बेल्जियममध्ये हा नियम लागू करण्यात आला असला तरी फ्रान्स, इटली, जर्मनी, स्लोव्हाकिया, फिलीपीन्स, कॅनडा, आणि आयर्लंड या देशांमध्ये आधीपासूनच हा नियम आहे. 

राईट टू डिस्कनेटमुळे परदेशातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता भारतात असा नियम कधी लागू होतो याबाबत मात्र सर्वांना नक्कीच उत्सुकता असेल.

Read More