Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिकेत 'या' 12 देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी; ट्रम्प सरकारचा कठोर निर्णय, भारत, पाकिस्तान...

US Travel Ban List: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा सपाटा लावला होता. त्यातच आता आणखी एका निर्णयाची भर...   

अमेरिकेत 'या' 12 देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी; ट्रम्प सरकारचा कठोर निर्णय, भारत, पाकिस्तान...

US Travel Ban List: जागतिक महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेनं आता एक अतिशय कठोर निर्णय घेत एकदोन नव्हे, तर तब्बल 12 देशांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प सरकारनं जवळपास 12 देशांना Danger List मध्ये टाकण्यात आलं असून, या देशांतील नागरिकांना अमेरिकेत पूर्णपणे प्रवेश नाकारण्यात येत आहे. 

भारत आणि पाकिस्तानची शेजारी राष्ट्र असणाऱ्या एकूण 12 देशांची यादी तयार करत डोनाल्ड ट्रम्प यानी अतिशय कठोर निर्णय घेतल्याची चर्चा जागतिक राजकारणामध्ये सुरू आहे. अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात आलेल्या या देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमानरचाही समावेश आहे. याशिवाय इराण, लिबियासाठीसुद्धा अमेरिकेनं प्रवेशबंदी लागू केली आहे. 

 12 देशांच्या यादीत कोणाचा समावेश?

USA मध्ये प्रवेश नाकारण्यात आलेल्या या 12 देशांच्या यादीत चाड, काँगो प्रजासत्ताक, इक्वेट्रियल गिनी, इरीट्रिया, हैती, इराण, लिबिया, सूदान, यमनचा समावेश आहे. तर, इतर सात देशांवर आंशिक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि वेनेझ्युएलाचा समावेश आहे. वरील देशांचा उल्लेख अती जोखमीच्या श्रेणीमध्ये करण्यात आला असून, या देशांकडे त्यांच्या नागरिकांची पुरेशी माहिती नसणं, दहशतवादाशी असणारा संबंध आणि अमेरिकी संरक्षण यंत्रणांना सहकार्य न करण्याचे निकष इथं विचारात घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. 

इस्लामिक राष्ट्रांना अमेरिकेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय 

आंशिक निर्बंध लावण्यात आलेल्या देशांच्या नागरिकांना बी1, बी2 असे उच्चस्तरिय व्हिसा नाकारण्यात येणार आहेत. ज्यामुळं त्यांना आता अमेरिकेत दीर्घकाळासाठी थांबता येणार नाहीय. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीनं या वृत्ताला दुजोरा दिला असून या निर्णयाला पाठिंबा देणारी काही उदाहरणं दिली. ज्यामध्ये अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता, कायदा आणि सुव्यवस्थेची चिंताजनक परिस्थिती, इराण आणि क्युबाकडून दहशतवादाला मिळणारं समर्थन, हैती आणि चाडसारख्या देशांकडून सातत्यानं अमेरिकेत होणारा घुसखोरीचा प्रयत्न अशी कारणं अमेरिकेनं पुढे केली. 

हेसुद्धा वाचा : Indian Railway : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या; रेल्वेतिकीट बुकिंगचे नियम बदलले, आता तत्काळ तिकिटासाठी... 

कट्टरतावादी इस्लामिक राष्ट्रांना अमेरिकेपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय आणि त्या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी हा निर्णय अतिशय योग्य असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. 

Read More