Marathi News> विश्व
Advertisement

अब्जावधी गुगल आणि अ‍ॅपल अकाउंटचे पासवर्ड चोरीला; तुम्ही यातून कसे वाचू शकता? जाणून घ्या!

Google and Apple account Passwords stolen: एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये सुमारे 16 अब्ज पासवर्ड लीक झाले आहेत.

अब्जावधी गुगल आणि अ‍ॅपल अकाउंटचे पासवर्ड चोरीला; तुम्ही यातून कसे वाचू शकता? जाणून घ्या!

Google and Apple account Passwords stolen: एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये सुमारे 16 अब्ज पासवर्ड लीक झाले आहेत. ज्याचा इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लीकच्या यादीत समावेश झाला आहे. फोर्ब्सच्या मते, या लीकमुळे आता लाखो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात आला आहे. यामुळे लोकांचे सोशल मीडिया अकाउंट देखील हॅक होऊ शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा जुना डेटा नाही. उलट, त्यात बहुतेक नवीन डेटा आहे. जो लोकांसाठी एक मोठी समस्या बनला आहे. हॅकर्स एकतर हा डेटा थेट वापरतात. जर असे झाले नाही तर ते लोकांचा डेटा डार्क वेब फोरमला विकतात.

डेटा लीकमुळे वाढलेलोकांचे टेन्शन 

फोर्ब्सच्या रिपोर्टमुळे लोकांचे टेन्शन वाढले आहे. ज्यानुसार 184 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड सुरक्षिततेशिवाय पडले आहेत. त्यात 30 हून अधिक डेटासेट आहेत. ज्यामुळे लोकांची माहिती सहज मिळू शकते, असे  फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या डेटा लीकमुळे लोक अनेक समस्यांमध्ये अडकू शकतात. जसे हॅकर्स त्यांचे ईमेल, सोशल मीडिया अकाउंट आणि वैयक्तिक माहिती चोरू शकतात आणि त्याचा गैरवापर करू शकतात. यामध्ये फसवणूक आणि ओळख चोरीचा समावेश आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय. 

स्वतःचे संरक्षण कसे कराल? 

तुम्हाला यावर त्वरित प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम लोकांना त्यांच्या सर्व अकाउंटचा पासवर्ड बदलावा लागतो. याशिवाय टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन उघडावे लागते, असे तज्ज्ञ सांगतात. यासोबतच वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. ज्यामुळे तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता खूप कमी होते, असेही तज्ज्ञांनी सांगितलंय.

अंतराळात नाही तर जमीनीखाली आहेत एलियन?

एलियन हे विश्वासतील सर्वात मोठे रहस्य आहे. एलियन खरचं अस्तित्वात आहेत का? याबाबत नेहमीच वाद विवाद होतात. परग्रहावर  एलियनचे अस्तित्व असू शकते असाही दावा केला जातो. पहिल्यांच्या एलियनच्या अस्तित्वाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.   अंतराळात नाही तर जमीनीखाली एलियनचे अस्तित्व असू शकते अशा प्रकारची शक्यता आता वर्तवली जात आहे. अंटार्क्टिकामध्ये जमीनीखालून वैज्ञानिकांना रहस्यमयी सिग्नल मिळाले आहेत. पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. एलियन हे देखील मोठे रहस्. मानले जाते. एलियशी संपर्क झाल्याचा दावा अनके जण करतात. मात्र, प्रत्यक्षात पुरावा कोणीच देऊ शकलेले नाही. अशताच आता अंटार्क्टिकामध्ये काम करणाऱ्या संशोधकांच्या एका पथकाला बर्फाखालून विचित्र रेडिओ सिग्नल मिळाले आहेत. नासाच्या प्रकल्प असलेल्या अंटार्क्टिक इम्पल्सिव्ह ट्रान्झियंट अँटेना (ANITA) वापरून हे सिग्नल कॅप्चर करण्यात आले आहे. हे सिग्न म्हणजे रहस्यमयी ध्वनी लहरी आहेत. शास्त्रज्ञांची टीम ANITA कडून मिळालेल्या डेटाची तुलना अंटार्क्टिकामधील आइसक्यूब आणि अर्जेंटिनामधील पियरे ऑगर वेधशाळेतील इतर दोन महत्त्वाच्या न्यूट्रिनो डिटेक्टरमधील माहितीशी करत आहे. परंतु अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही.  तथापि, काही शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की हे सिग्नल बर्फ आणि अवकाशाभोवती असलेल्या गडद पदार्थाशी किंवा काही अज्ञात रेडिओ सिग्नलशी संबंधित असू शकतात.  अंटार्क्टिक बर्फाखाली काय घडत आहे आणि का घडत आहे हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आणि डेटाची आवश्यकता असेल असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे रहस्यमयी सिग्नल एलियनने पाठवलेले असू शकतात असाही निष्कर्ष काढला जात आहे. 

Read More