Marathi News> विश्व
Advertisement

बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर आत्मघातकी हल्ला; 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा

BLA Attack on Pak Army:  पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील संघर्ष वाढताना दिसत आहे. बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला ज्यात बीएलएने दावा केलाय की, 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर आत्मघातकी हल्ला; 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा

BLA Attack on Pak Army:  पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पाकिस्तानातील क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला. स्फोटकांनी भरलेल्या कारने सैन्याच्या बसला धडक दिली ज्यात 90 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आलाय. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. गेल्या पाच दिवसांत पाकिस्तानवर तिसरा मोठा हल्ला झाला आहे.

हा हल्ला क्वेट्टापासून 150 किमी अंतरावर असलेल्या नोश्की इथे करण्यात आला. या हल्ल्यानंतर लष्कराने परिसरात हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात केले आहेत. शनिवारी लष्कराचा ताफा तफ्तानला जात होता. या ताफ्यात सात लष्करी बस आणि इतर दोन वाहने होती, ज्यांवर हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आयईडीने भरलेले एक वाहन लष्कराच्या ताफ्याच्या बसला धडकली. हा एक आत्मघातकी हल्ला होता.

नोश्की स्टेशनचे एसएचओ जफरउल्लाह सुलेमानी म्हणाले की, सुरुवातीच्या अहवालात हा आत्मघातकी हल्ला असल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले की आत्मघातकी हल्लेखोराने जाणूनबुजून स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या ताफ्यात धडकवले. 

त्यांनी सांगितलं की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केलं असून शहीद जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

तर पाकिस्तान पोलिसांच्या मते, या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 10 जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिस प्रमुख जफर जमानानी यांनी सांगितलं की, हा हल्ला बलुचिस्तानमधील नौश्की जिल्ह्यात झाला. त्यांनी सांगितलं की, स्फोटात जवळच असलेल्या दुसऱ्या बसचेही मोठे नुकसान झालं आहे. 

fallbacks

बीएलएने एक निवेदन जारी करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून बलुच लिबरेशन आर्मीच्या आत्मघाती तुकडी असलेल्या माजीद ब्रिगेडने नोशकी येथील आरसीडी महामार्गावर पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला केलाय. या ताफ्यात आठ लष्करी बस होत्या. यापैकी एका बसचे स्फोटात पूर्णपणे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर लगेचच, बीएलएच्या फतेह पथकाने दुसऱ्या लष्करी बसला पूर्णपणे वेढा घातला आणि त्यातील सर्व लष्करी सैनिकांना ठार केले. यात 90 पाकिस्तानी सैनिक ठार झालाचा दावा करण्यात आलाय.

Read More