Marathi News> विश्व
Advertisement

पाकिस्तानमध्ये अख्खी एक्सप्रेस ट्रेन हायजॅक, 150 प्रवाशांना मारून टाकण्याची धमकी

पाकिस्तानात चक्क ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. बलूच लिबरेशन आर्मी नावाच्या संघटनेने जाफर एक्स्प्रेसला हायजॅक केलं आहे. यावेळी ट्रेनमधील 450 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. जर आपल्याविरोधात काही सैन्य कारवाई केली तर सर्व प्रवाशांना मारुन टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील स्थानिक मीडियानुसार, ट्रेनमध्ये 45 प्रवासी प्रवास करत होते.   

ट्रेनमध्ये लष्कर आणि ISI ची लोक

ओलीस ठेवलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवादी विरोधी दल आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे कर्मचारी आहेत. हे सर्वजण सुट्टी घालवण्यासाठी पंजाबला निघाले होते. बीएलएने जर ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांपैकी कोणीही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर सर्व ओलीसांना मारुन टाकू अशी धमकी दिली आहे. 

महिला आणि लहान मुलांची सुटका

बीएलएने महिला, लहान नुलं आणि बलूचच्या प्रवाशांची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएचं फिदायीन युनिट, मजीद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहे. ज्यामध्ये फतेह स्क्वाड, एसटीओएस आणि गुप्त शाखांचा सहभाग आहे. 

Read More