Marathi News> विश्व
Advertisement

तुम्हाला सगळीकडे Black Friday Sale च्या जाहिराती का दिसतात?

What Is Black Friday: ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय या दिवशी विविध वस्तंवर व दुकानात डिस्काउंट का देण्यात येतात, जाणून घ्या. 

तुम्हाला सगळीकडे Black Friday Sale च्या जाहिराती का दिसतात?

What Is Black Friday: दिवाळी, दसरा, नाताळ, नववर्ष या दिवसांत कंपन्यांकडून खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण  ब्लॅक फ्रायडेच्या दिवशीदेखील खरेदीवर बंपर ऑफर्स आणि डिस्काउंट असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय आणि त्या दिवशी खरेदीवर इतक्या मोठ्या प्रमाणात सूट का दिली जाते? ब्लॅक फ्रायडे आणि शॉपिंग यांचे नेमकं कनेक्शन काय, याचे कारण आज जाणून घेऊया. 

ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी विविध कंपन्या सूट आणि डिस्काउंट देतात. खरं तर ही अमेरिकेतील परंपरा आहे. थँक्सगिव्हिंगनंतर  ब्लॅक फ्रायडे साजरा केला जातो आणि त्या दिवसांपासून सूट्ट्यांच्या शॉपिंगचा सिझन सुरू होतो. ब्लॅक फ्रायडेने थँक्सगिव्हिंगच्या परंपरेत स्वतःचं स्थान टिकवून ठेवलं आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. जो वर्षातील सर्वाधिक नफा मिळवतात. 

ब्लॅक फ्रायडेपासून सुट्ट्यांच्या सीझनची शॉपिंगची सुरुवात होते. ज्यामुळं संपूर्ण वर्षांतील जवळपास 20 टक्के नफा एका दिवसात व्यापारी कमावतात. 2024मध्ये ब्लॅक फ्रायडे 29 नोव्हेंबर रोजी येणार आहे. थँक्सगिव्हिंग नंतर साजरा केला जातो. या दिवशी व्यापारी विविध उत्पादनांवर सूट दिली जाते. तसंच, प्रमोशनदेखील देण्यात येते. ज्यामुळं ग्राहक मोठ्या संख्येने आकर्षित होतात. 

ब्लॅक फ्रायडे शब्द कुठून आला?

ब्लॅक फ्रायडे हे नाव पहिल्यांदा 24 सप्टेंबर 1869 रोजी वापरण्यात आले होते. सोन्याच्या सट्टेबाजांनी अमेरिकेत आर्थिक दहशत निर्माण केली होती हा दिवस शुक्रवार होता. या दहशतीची तीव्रता दर्शवण्यासाठी ब्लॅक हा शब्द वापरण्यात आला होता. मात्र, आणखी एका संदर्भानुसार, 1950 च्या दशकात कारखाना व्यवस्थापकांनी प्रथम थँक्सगिव्हिंगनंतरच्या शुक्रवारचा ब्लॅक फ्रायडे म्हणून उल्लेख केला होता. 

अमेरिकेत थँक्सगिव्हिंग चौथ्या गुरुवारपासून साजरा केला जातो. या दिवसांत कुटुंबासोबत वेळ घालवला जातो. त्यानंतरचा शुक्रवार हा कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी म्हणून दिला जातो. हाच दिवस व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिसतो. या दिवसापासून नववर्ष आणि नाताळसाठीची शॉपिंग करण्यास सुरुवात केली जाते. त्यामुळं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्लॅक फ्रायडे सेलची सुरुवात करण्यात आली. 

1980 आणि 1990 च्या दशकात मोठे विक्रेते जसं वॉलमार्ट आणि बेस्ट बाय यांनी त्यांच्या दुकानांसमोर डिस्काउंट आणि सूट असे बॅनर लावले तर सकाळी लवकर दुकाने उघडण्याची परंपरा सुरू केली. त्यांनीच ब्लॅक फ्रायडे हा शॉपिंगचा सर्वात मोठा दिवस असल्याचे रुजवले. गेल्या 20 वर्षांत इंटरनेट आणि जागतिकीकरणामुळं ब्लॅक फ्रायडे अमेरिकाबाहेरही साजरा केला जाऊ लागला. 

Read More