Blackout on Earth Solar Superstorm Threat : GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन, सॅटेलाइट टीव्ही सर्व डिव्हाईसचे सिग्नल जाणार; पृथ्वी ब्लॅकआउट होणार... कोणत्या भविष्यवेत्याने नाही तर NASA ने हा भयानक अलर्ट दिला आहे. सूर्यावर सध्या एका भायनक सौर वादळाचा विस्फोट झाला आहे. या स्फोटानंतर X1.2 वर्गीकरणातील सौरज्वाला बाहेर पडू शकतात. नासाने 24 तासांचा अलर्ट दिला आहे. याचा भयानक परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो.
सुर्य हा पृथ्वीला ऊर्जा देणारा स्त्रोत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळते. यामुळेच पृथ्वीतलावर सजीवाचे अस्तित्व कायम आहे. सूर्यावर घडणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम पृथ्वीवर होतो. सूर्यावर सध्या एका भायनक सौर वादळाचा विस्फोट झाला आहे. NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ने सूर्यावर आलेल्या या वादळाचे फोटो कॅप्चर केले आहेत. हे फोटो पाहून NASA चे संशोधक टेन्शनमध्ये आले आहेत. कारण या सौर वादळानंतर भयानक सौर ज्वाला पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ येऊ शकतात. यामुळे पृथ्वीवर रेडिओ ब्लॅकआउटचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
या सौर ज्वालामुळे धोकादायक किरणोत्सर्ग, उष्णता आणि चुंबकीय ऊर्जा बाहेर पडली. या सर्व गोष्टींचा पृथ्वीवरील आपल्या तंत्रज्ञानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्याचे नुकसान देखील होऊ शकते. अंतराळ हवामानशास्त्रज्ञ डॉ. तमिथा स्कोव्ह म्हणाल्या की याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम गोलार्धावर झाला. याचा थेट अर्थ असा की अमेरिकेचा पश्चिम किनारा, पूर्व रशिया, अलास्का, न्यूझीलंड आणि आशिया-पॅसिफिक प्रदेश देखील याचा परिणाम करू शकतो. ज्वाला बाहेर पडताच, पॅसिफिक महासागरावर रेडिओ ब्लॅकआउट झाला. हवाई येथील हॅम रेडिओ ऑपरेटर्सनी अचानक सिग्नल गमावल्याची तक्रार केली. आता नासा आणि इतर अंतराळ संस्था सनस्पॉट ४११४ वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
NASA च्या Solar Dynamics Observatory (SDO) ने सूर्याच्या पृष्ठभागावर यापूर्वी X9-श्रेणीचा सौरज्वाळा कॅप्चर केल्या होत्या. यानंतर आता X1.2 श्रेणीच्या सौरज्वालांची नोद झाली आहे. 2017 नंतर आलेला प्रथमच या शक्तिशाली सौर ज्वालांचा भडका झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. म्हणणे आहे.
या आता झालेल्या सौरवादळानंतर निघालेल्या सौरज्वाला पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. या वादळाचा सजीवावर थेट परिणाम होणार नसली तरी रेडिओ सिग्नल्सवर याचा परिणाम होणार आहे. या सौर वादळामुळे सिंग्नल यंत्रणेत व्यत्यय येवू शकतो. GPS नेव्हिगेशन, मोबाईल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीमध्ये अडचण येवू शकते. पॉवर लाईनमधील करंट जास्त असू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर देखील उडू शकतो. पॉवर ग्रीडवर या परिणाम होऊन ब्लॅकआऊट होऊ शकतो. 1755 पासून या सौर वादळांची नोंद केली जात आहे. तेव्हापासून आा पर्यंत 25 वेळा अशा प्रकारच्या सौर वादळांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस हे सौरवादळ अधिक वेगवान झाले आहे. अंदाजापेक्षा जास्त सनस्पॉट्स आणि उद्रेक होताना दिसत आहेत.