Marathi News> विश्व
Advertisement

धक्कादायक! प्रेयसीला मनवण्यासाठी चक्क तरुणानं नेल्या आईच्या अस्थी

ऐसा कौन करता है भाई! प्रेयसीला मनवण्यासाठी या पठ्ठानं चक्क आईच्या अस्थीच सोबत नेल्या, गर्लफ्रेंड म्हणाली...

धक्कादायक! प्रेयसीला मनवण्यासाठी चक्क तरुणानं नेल्या आईच्या अस्थी

वॉशिंग्टन: गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी तिला मनवण्यासाठी महागडे गिफ्ट, चॉकलेट्स किंवा फूल घेऊन अनेकजण भेटतात. मात्र चक्क एका तरुणानं आपल्या आईच्या अस्थी गर्लफ्रेंड समोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडला डेट करायला पोहोचलेल्या या तरुणानं चक्क आईच्या अस्थी अशा अचानक समोर ठेवल्यानं गर्लफ्रेंडही अवघडली आणि तिलाही काहीच सुचेना. हा संपूर्ण प्रकार नेमका काय होता ते गर्लफ्रेंडनं सांगितलं आहे. 

मिररने दिलेल्या वृत्तानुसार या तरुणीनं असा कधीही विचार केला नव्हता की थेट तिला पहिल्याच डेटवेळी बॉयफ्रेंड तिला आईच्या अस्थींसह भेटणार आहे. हा प्रकार घडल्यानंतर गर्लफ्रेंडला मोठा धक्काच बसला. तिला आजही ही घटना आठवून अंगावर काटा येतो असं ती सांगते. 

या तरुणीनं सांगितलं की तिची एका तरुणाशी डेटिंग अॅपवरून ओळख झाली. टिंडर अॅपवरून झालेली ही ओळख पुढे वाढत गेली आणि मैत्रीचं नातं प्रेमात बदललं. एकमेकांप्रती प्रेम वाटू लागल्यानं त्यांनी अखेर भेटण्याचा निर्णय घेतला. पहिली भेट किती छान असेल या विचारानं तरुणी भारावून गेली होती. मात्र जे समोर आलं त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली.

गर्लफ्रेंडने सांगितलं की ती बॉयफ्रेंडला भेटायला गेली. त्यावेळी तिथे भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडनं आईच्या अस्थी टेबलवर ठेवल्या. हे पाहून आनंद करावी की दु:ख की रडावं हे समजत नव्हतं. ती वेळ खूप विचित्र होती. कसाबसा तो वेळ गेला. 

जाता जाता तरुणाने मेसेज केला की तू माझ्या आईला आवडलीस, लवकरच परत भेटू. तरुणाचं हे वागणं जरा तिला विचित्रच वाटलं. तिने लगेच रिप्लाय केला की तुझ्या आईसोबत मला कोणतंही कनेक्शन किंवा आपलंस वाटलं नाही. त्यामुळे यापुढे आपण कधीही भेटायचं नाही. हा मेसेज टाकून तिने सुटकेचा निश्वास टाकला. हा अनुभव ती कधीही विसरू शकत नाही असंही तिने सांगितलं आहे. 

Read More