Marathi News> विश्व
Advertisement

महिलेचा अफलातून बिझनेस! Breast Milk पासून बनवली ज्वेलरी, महिन्याला कोटींची उलाढाल

 Business Idea:आतापर्यंत तुम्ही अनेक उद्योग व्यवसायांबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये केवळ नफाच नाही तर हा व्यवसाय भावनिक सादही घालतो.

महिलेचा अफलातून बिझनेस! Breast Milk पासून बनवली ज्वेलरी, महिन्याला कोटींची उलाढाल

लंडन : Business Idea:आतापर्यंत तुम्ही अनेक उद्योग व्यवसायांबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये केवळ नफाच नाही तर हा व्यवसाय भावनिक सादही घालतो.

 हा व्यवसाय आईच्या दुधापासून दागिने बनवण्याचा आहे. आपणा सर्वांना माहित आहेच की आईच्या दुधाचे सेवन हे बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते बालकांसाठी अमृत असतं. हे अमृत सांभाळण्यासाठी तसेच आठवणीत राहण्यासाठी त्यापासून दागिने तयार केले जात आहेत. हा व्यवसाय विचित्र वाटू शकतो परंतू लंडनच्या एका महिलेने हा व्यवसाय सुरू केला आहे.

आईच्या दुधाचे दागिने

fallbacks

लंडनस्थित मॅजेन्टा फ्लॉवर नावाची कंपनी केवळ आईच्या दुधापासून दागिने बनवत नाही तर त्यातून कोटींचा नफाही कमावत आहे. आता 'ब्रेस्ट मिल्क ज्वेलरी' ही संकल्पना फॅशन इंडस्ट्रीतही खूप लोकप्रिय होत आहे. हा व्यवसाय भारतातही सुरू झाला आहे. 

लंडनमध्ये सुरू

fallbacks

लंडनमध्ये राहणाऱ्या तीन मुलांची आई असलेल्या साफिया रियादने हा वेगळ्या प्रकारचा व्यवसाय सुरू केला होता. साफिया रियादने सर्वप्रथम स्वतःच्या दुधापासून दागिने बनवले. यानंतर 2019 मध्ये सफिया रियाद आणि तिचा पती अॅडम रियाद यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन याची सुरुवात केली. पती-पत्नी दोघांनी मिळून मॅजेन्टा फ्लॉवर्स नावाची कंपनी सुरू केली.


हा व्यवसाय विशेष का आहे?

fallbacks

आता ही एक पुरस्कार विजेती कंपनी बनली आहे आणि आतापर्यंत या कंपनीने Breast Milk दागिन्यांच्या 4000 हून अधिक ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. आईच्या दुधाचे दागिने देखील लोकप्रिय होत आहेत कारण त्यामागणे एक स्त्रीच्या प्रेमळ आणि मायेच्या भावना असतात. .

15 कोटींची उलाढाल

fallbacks

आमची सहयोगी वेबसाईट DNA च्या अहवालानुसार, ही कंपनी 2023 पर्यंत 1.5 दशलक्ष पौंड म्हणजेच 15 कोटींचा व्यवसाय करू शकते. म्हणजेच 'द मिरर'च्या वृत्तानुसार, या जोडप्याने कुठेतरी आईच्या दुधापासून बनवलेल्या ज्वेलरीबद्दल वाचले होते, त्यानंतर दोघांनी त्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आईच्या दुधापासून हार, कानातले आणि अंगठ्या बनवता येतात. एक दागिना बनवण्यासाठी 30 ml दूध लागते.

Read More