Marathi News> विश्व
Advertisement

लोकांचा एटकेपणा दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, सरकारचा निर्णय

एकटेपणाला कंटाळला आहात? काळजी नको, लवकरच सुटेल समस्या.... सरकार करणार मदत....

लोकांचा एटकेपणा दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, सरकारचा निर्णय

लंडन : केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात एकटेपणा आणि नैराश्येने ग्रासलेल्या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. बदलत्या काळाने निर्माण केलेल्या ताणामुळे त्यात आणखी भर पडते आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी इग्लंड सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

खासदार जॉ कॉक्स यांच्या स्मरणार्थ मंत्रालयाची स्थापना

एकटेपणा आणि नैराश्येने ग्रासलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना त्यातून बाहेर काढणे यासाठी एक स्वतंत्र मंत्रालयच नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने या नव्या मंत्रालयाची निर्मिती करत असताना क्रीडा आणि सिव्हील सोसायटी मंत्री ट्रेसी क्राऊच यांच्याकडे या मंत्रालयाचा कारभार सोपवला आहे. इग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मंत्रालयातील लेबर पक्षाचे खासदार जॉ कॉक्स यांच्या स्मरणार्थ हे मंत्रालय स्थापण करण्यात आले आहे. 

कॉक्स आयोगाच्या शिफारशीनुासर चालणार काम

थेरेसा मे यांच्या कार्यालयाने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, खासदार जो कॉक्स यांनी आपले जीवन देशातील नागरिकांचे एकटेपणा आणि त्यांचे नैराश्य दूर करण्यासाठी अर्पण केले होते. लोकांचा एकटेपणा आणि नैराश्य दूर करण्यासाठी कॉक्स यांनी प्रचंड काम केले. एकटेपणा आणि नैराश्य दूर करण्याबाबात नेमण्यात आलेल्या एका आयोगाच्या माध्यमातून सरकारला त्यांनी अनेक शिफारशी सुचवल्या. सध्या स्थापण करण्यात आलेले मंत्रालयही जो कॉक्स यांनी केलेल्या शिफारशी डोळ्यासमोर ठेऊनच काम करेन असेही थेरेसा मे यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

एकटेपणाने लाखो लोक ग्रस्त

एक सर्व्हेनुसार, इग्लंडमध्ये सुमारे ९० लाख लोक एकटेपणा आणि नैराश्येचे शिकार आहेत. यात जवळपास दोन लाक लोक आपले मित्र, नातवाईक यांच्यासोबत संवाद करत नाहीत. तर, १८ ते ३४ वयोगटातील जवळपास ८५ टक्के युवक हे एकटेपणाने ग्रासले आहेत.

Read More