World News : जगभरातील विविध देशांमध्ये सध्या तणावाची परिस्थिती असून कुठे राजकीय तणावाची परिस्थिती, तर कुठे सीमावाद, कुठे तर अगदीच युद्धाचे ढग पाहायला मिळत आहेत. याच संपूर्ण परिस्थितीमध्ये एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून अनेकांचाच थरकाप महाकाय जहाजाला जलसमाधी मिळताना दिसत आहे.
जागतिक वर्तुळामध्ये चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार पश्चिम आशियाई भागामध्ये पुन्हा एकदा संकटाचं सावट पाहायला मिळत असून, AP च्या वृत्तानुसार नुकतंच लाल समुद्रामध्ये असणाऱ्या एका ब्रिटीश जहाजावर येमेनच्या किनाऱ्यानजीक रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान तुफान गोळीबारसुद्धा करम्यात आला. या जहाजावर असणाऱ्या सुरक्षा दलानं हल्ल्याच्या प्रत्युत्तरात प्रतिहल्लाकेला मात्र वेळ हातची निघून गेली होती.
मध्यपूर्वेत सुरू असणाऱ्या युद्ध आणि संघर्षादरम्यान येमेनच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या एका व्यावसायिक जहाजावर भयंकर सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी जहाजावर बेछूट गोळीबार आणि रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPGs) डागले. सूत्रांच्या या माहितीनुसार प्रचंड हल्ल्यामुळं या जहाजाला टायटॅनिकप्रमाणंच जलसमाधी मिळाली. दरम्यान युके मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरनं याबाबत दिलेल्या माहितीनुसार अद्यापही हा संघर्ष सुरूच असून त्यासंदर्भात तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार हुथी बंडखोर गटाने या प्रदेशात येणाऱ्या अनेक व्यावसायिक आणि लष्करी जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. गाझा पट्टीमध्ये हमासवर इस्रायलच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ होणाऱ्या या हल्ल्यांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.
साधारण नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2025 दरम्यान, हुथींनी १०० हून अधिक व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्याची आकडेवारी समोर आली असून , त्यापैकी दोन जहाजं बुडून चार खलाशांचा मृत्यूही झाल्याचंही वृत्त आहे.
BREAKING
— Iran Observer (@IranObserver0) July 8, 2025
Yemeni Forces released footage of raiding and blowing up the bulk carrier MAGIC SEAS for violating the blockade imposed on Israel pic.twitter.com/aBsTSugmpl
सातत्यानं सुरू असणाऱ्या या हुथी हल्ल्यांमुळे लाल समुद्राच्या परिसरातून होणाऱ्या व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरवर्षी सुमारे 1 ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तूंची ये-जा या मार्गानं होते मात्र येथील तणावपूर्ण परिस्थितीमुळं या व्यापारात लक्षणीय घट झाल्याची बाब प्रकर्षानं समोर आली आहे.