World Tallest Building Burj Khalifa Flat Price : दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफा माहित नाही असं क्वचितच कुणी तरी सापडेल. जगभरातील पर्यटक खास बुर्ज खलिफा पाहण्यासाठी दुबईत येतात. जगातील सर्वात महागडी इमारत अशी देखील बुर्ज खलिफाची ओळख आहे. जाणून घेऊया बुर्ज खलिफा इमारतीत सर्वात स्वस्त आणि महागडा फ्लॅट कितीला मिळतो?
बुर्ज खलिफा ही 163 मजल्यांची जगातील सर्वात उंच इमारत आहे. 2004 मध्ये बुर्ज खलिफाचे बांधकाम सुरू झाले आणि ते 2010 मध्ये पूर्ण झाले. ही इमारत बांधायला 6 वर्षे लागली. बुर्ज खलिफा इमारत एमार प्रॉपर्टीज या कंपनीच्या नावावर आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील ही एक प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. मोहम्मद अल्बर हे एमार प्रॉपर्टीजचे अध्यक्ष आहेत. मोहम्मद अल्बर यांच्या कल्पनेतुनच बुर्ज खलिफा इमारत ही प्रत्यक्षात साकारली आहे. Samsung C&T, Basics आणि Arabtec या तीन कंपन्यांनी बुर्ज खलिफा बांधला आहे.
बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की तुम्ही ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही ही इमारत दिसते. बुर्ज खलिफा पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. बुर्ज खलिफा इमारत इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बुर्ज खलिफाच्या 76 व्या मजल्यावर असलेला स्विमिंग पूल जगातील सर्वात उंच स्विमिंग पूलपैकी एक आहे. बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आहे. बुर्ज खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे. बुर्ज खलिफाच्या ग्लॅमरबद्दल तसेच त्यामध्ये असलेल्या फ्लॅट्स आणि हॉटेल्सच्या किंमतीची नेहमीच चर्चा असते.
बुर्ज खलिफामध्ये 4000 ते 8000 चौरस फूट क्षेत्रफळाचे 33 अपार्टमेंट आहेत. काही पेंटहाऊसची किंमत 100 दशलक्ष दिरहमपेक्षा जास्त आहे. खाजगी अपार्टमेंट 45 ते 108 मजल्यांवर आहेत. एक ते चार बेडरूमचे हे फ्लॅट आहेत. बुर्ज खलिफामधील सर्वात महागड्या अपार्टमेंट्सच्या किमती प्रीमियम आहेत. 2024 मध्ये एक अपार्टमेंट 315 दशलक्ष दिरहम म्हणजे भारतीय किंमतीनुसार 7,50,24,36,900.0 रुपयांना विकण्यात आला. www.luxhabitat.ae नुसार ही माहिती मिळाली. बुर्ज खलिफामधील सर्वात स्वस्त अपार्टमेंट्स एका स्टुडिओसाठी भारतीय किंमतीनुसार 5,06,11,677.50 रुपये पासून सुरू होतात. अपार्टमेंटची किंमत त्याच्या आकारावर अवलंबून असते.