जर तुम्ही आरामात आपल्या कुटुंबीयांसोबत जेवणाचा आस्वाद घेत असाल आणि अचानक तुमच्या समोर जंगली प्राणी जसे की वाघ, चित्ता, सिंह किंवा अन्य प्राणी आले, तर हा क्षण किती भितिदायक आणि थक्क करणारा असेल. तसचं काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसला. या व्हायरल व्हिडीओमध्ये शेख मेजवानीचा आस्वाद घेताना दिसत आहे. लांब गालिचे अंथरलेले होते, मोठ्या प्लेट्समध्ये बिर्याणी सर्व पाहुण्यांना दिली जात होती आणि सर्व आरामात त्याचा आनंद घेत होते. या मेजवानीत एक विशेष गोष्ट घडली, जे पाहून लोक थक्क झाले. या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी एक पाहुणा तिथे आला. हे दृश्य पाहून नेटकरी भयभित झाले.
या व्हिडीओमध्ये शेखांच्या मोजवानीमध्ये चक्क चित्ताचं आला. मनोरंजक गोष्ट अशी आहे की चित्ता हळूहळू अन्नाचा वास घेत मेजवानीत सामील होतो. हे जंगली प्राणी खूप भितीदायक असतात. तसचं आपण त्यांना पाहिले तरी आपल्या शरीराचा थरकाप होऊ लागतो. परंतु इथे दृश्य पूर्णपणे वेगळे होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्याचे काहीही भय वाटले नाही आणि ते शांतपणे त्याला मेजवानीचा आनंद घेताना पाहत होते. चित्त्याची उपस्थिती नेहमीच भयानक वाटते, पण इथे त्याचा स्वभाव शांत असल्याने, लोक त्याला न जुमानता आरामात मेजवानीचा अनुभव घेत होते.
हा व्हिडीओ @uae_lionking पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे पेज UAE मध्ये शेख आणि श्रीमंत लोकांसोबत वन्य प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करणारे एक लोकप्रिय अकाउंट आहे. या पेजवर सिंह, चित्ता, वाघ आणि इतर धोकादायक प्राण्यांसोबत आरामात बसलेल्या लोकांचे व्हिडीओ अनेक वेळा शेअर केले जातात. व्हिडीओला आतापर्यंत 7.8 दशलक्ष लोकांनी पाहिले आहे, ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
हे ही वाचा: विध्वंस अटळ! पृथ्वीच्या 'या' भागाला मिळणार जलसमाधी, कोण थांबवणार हे संकट?
चित्ता त्यांच्यासोबत अगदी आरामात मेजवानीचा आनंद घेत असल्याचे दिसते. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील दृष्य असावे असे वाटत होते. परंतु ते वास्तविकतेमध्ये घडत असल्याने लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोक कमेंट करत आहेत, 'हा खऱ्या शेखांचा अभिमान आहे!', तर काहींनी मजेशीरपणे लिहिले, 'चित्तालाही बिर्याणी आवडली!' पण काही लोकांचे मत आहे की, मानवांच्या मेजवानीत चित्त्याला समाविष्ट करणे धोकादायक आहे आणि त्यांना असं वाटतं की हा अभिमान नाही तर वेडेपणाचं आहे.
या व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आहे आणि लोक यावर विविध दृष्टिकोनातून विचार करत आहेत. काहींना हे शेखांच्या धाडस वाटते, तर काहींना या दृश्यातून एक धोकादायक मानसिकता दिसते.