Marathi News> विश्व
Advertisement

एक थरार : सर्कस सुरु असताना वाघ आणि सिंहीणीचा घोड्यावर हल्ला

आता बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची. चीन मधील हेगई प्रांतात एका सर्कसमध्ये घोड्यावर वाघ आणि सिंहीणीनं हल्ला केला.

एक थरार : सर्कस सुरु असताना वाघ आणि सिंहीणीचा घोड्यावर हल्ला

बीजिंग : आता बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची. चीन मधील हेगई प्रांतात एका सर्कसमध्ये घोड्यावर वाघ आणि सिंहीणीनं हल्ला केला.

सर्कसमध्ये खेळ सुरु असताना

सर्कसमध्ये खेळ सुरु असताना रिंगमध्ये आलेल्या घोड्यावर अचानक वाघ आणि सिंहीणीनं हल्ला केला. या दोघांच्या तावडीतून सुटण्यासाठी घोडा आटोकाट प्रयत्न करत होता.

रिंगमास्टरही धावून आले..

वाघ आणि सिंहिणीच्या तावडीत सापडलेल्या घोड्याला वाचवण्यासाठी रिंगमास्टरही धावून आले. चाबकाच्या सहाय्याने मारुनही सिंहीण आणि वाघ घोड्याला सोडत नव्हते. 

 प्रेक्षक मात्र चांगलेच हादरुन गेले

मात्र अखेर दोन्ही रिंगमास्टरनी या घोड्याची वाघ आणि सिंहीणीच्या तावडीतून सुटका केली. या घटनेमुळे मनोरंजनासाठी सर्कस बघायला गेलेले प्रेक्षक मात्र चांगलेच घाबरून गेले.

Read More