Marathi News> विश्व
Advertisement

युद्धाच्या मैदानात आता चीनचं 'मच्छर' उतरणार, काय आहे हा प्रकार?

तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन नेहमीच स्वत:ला अपग्रेड करत असतो. काय आहे नवी टेक्नॉलॉजी?

युद्धाच्या मैदानात आता चीनचं 'मच्छर' उतरणार, काय आहे हा प्रकार?

ब्युरो रिपोर्ट, झी २४तास : जगात सध्या युद्धाचे वातावरण असताना स्वतःला सशक्त करण्यासाठी चीनने एक पाऊल पुढे टाकलं आहे. चिनी वैज्ञानिकांनी एक लष्करी ड्रोन तयार केलं आहे. या ड्रोनचा आकार हा मच्छरासारखा आहे. मच्छराच्या आकाराचे हे ड्रोन युद्धाच्या मैदानात विध्वंस करण्यासाठी सज्ज आहे. गुप्त लष्करी कारवायांमध्ये या मच्छर ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. 

तुमच्या आजूबाजूला जर मच्छर फिरत असेल तर  तो चीनचा ड्रोनही असू शकतोय. ऐकून जरा विचित्र वाटलं ना. पण असं होऊ शकतं. कारण चीनने आणखी एक चमत्कार केला आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन नेहमीच स्वत:ला अपग्रेड करत असतो. आता तर काय चीनने मच्छरासारखा ड्रोन तयार केला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी मच्छराच्या आकाराचा लष्करी ड्रोन बनवला आहे. 

या ड्रोनचा आकार लहान असला तरी याच्या आकारावर जावू नका. युद्धात मोठा विनाश घडवण्याची ताकद या मच्छर ड्रोनमध्ये असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी चीन या छोट्याशा ड्रोनचा वापर करणार आहे. चीनच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापिठाने या ड्रोनची निर्मिती केली आहे.

सध्या जगात युद्धाचं वातावरण आहे. त्यामुळे स्वत:ला प्रत्येक परिस्थितीत सज्ज राहण्यासाठी चीननं आपली लष्करी ताकद आणखी वाढवत आहे. चीनने तयार केलेला हा छोटा ड्रोन अतिमहत्वाच्या मिशनसाठी खूप उपयोगी पडणार आहे. गुप्तचर मोहिमांसाठी हा ड्रोन अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या ड्रोनमुळे चीनने आधुनिक युद्घाचं चित्र पूर्णपणे बदललं आहे. आण्विक आणि  अत्याधुनिक शस्त्र साठ्यांमुळे चीन एक ताकदवान देश मानला जातो. त्यात चीनच्या या मच्छर ड्रोनमुळे चीनच्या शत्रू राष्ट्रांची चिंता वाढली आहे. 

Read More