Viral Photo: आतापर्यंत तुम्ही अनेक झाडांबद्दल ऐकलं असेल. आता तर तुम्ही हायब्रीड बाबतही माहिती असेल. मात्र सध्या एक वेगळंच झाडं चर्चेत आलंय. हे झाडं आहे ते म्हणजे कंडोमचं! हे वाचून तुम्हालाही थोडं विचित्र वाटलं असेल. मिळालेल्या माहितीनुसार, असं एक झाड मलेशियामध्ये आढळून आलंय. या झाडाच्या फांद्यांवर कंडोम लागल्याचं दिसून आलं. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात.
मेलेशियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने झाडं लावलं. हे लावलेलं झाड टोमॅटोचं होतं. मात्र त्यावर टोमॅटो ऐवजी कंडोम आल्याचं या महिलेला दिसलं. टोमॅटोच्या झाडाच्या फांदीवर कंडोम आल्याने ही महिला देखील थोडी गोंधळली.
दरम्यान हे खरं नाहीये. टोमॅटोच्या झाडावर कंडोम येण्यामागे वेगळचं कारण असल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. या सर्व प्रकाराला त्या महिलेच्या शेजारील लोकं कारणीभूत होती. झालं असं की, या महिलेने टोमॅटोचं झाड तिच्या बाल्कनीमध्ये ठेवलं होतं. यावेळी या महिलेच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने वापरेला कंडोम खाली फेकला. दरम्यान यावेळी हा कंडोम टोमॅटोच्या झाडात अडकला. त्यामुळे या महिलेला वाटलं की, टोमॅटोच्या झाडावर कंडोम लागले. मात्र पडताळणी केल्यानंतर त्या महिलेला सर्व गोष्टी लक्षात आल्या.
TW: Used condom.
— Mimie Rahman | Mental Health Therapist (@mimierhmn) May 10, 2023
Pesanan ikhlas ye anak anak.
Jangan la buang kondom dekat tingkap kalau hidup di kondo atau apartment.
Jatuh atas pokok ni, aku boleh la nak godek godek bagi masuk plastik tanpa guna tangan.
Tapi kalau jatuh atas compressor aircond aku, sape nak kutip?? pic.twitter.com/1zs4AWIS0m
या महिलेने याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. यामध्ये तिने याचे फोटो देखील पोस्ट केलेत. या महिलेच्या म्हणण्यानुसार, माझ्या घरी लहान मुलं देखील आहेत, अशा पद्धतीने कोणीही वापरलेलं कंडोम खाली फेकू नये. अशा गोष्टी नीट गुंडाळून फेकून दिल्या पाहिजेत. हे केवळ लज्जास्पद नसून अनहाजेनिक देखील आहे.