Marathi News> विश्व
Advertisement

Corona : श्रीलंकेमध्ये सापडला कोरोनाचा सर्वात घातक व्हायरस, एक तासात...

कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हायरस

Corona : श्रीलंकेमध्ये सापडला कोरोनाचा सर्वात घातक व्हायरस, एक तासात...

मुंबई : भारतासह जगात कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत आणखी एक वाईट बातमी अशी आहे की शेजारचा देश श्रीलंकामध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडला आहे. जो आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक विषाणू मानला जात आहे. कारण हा विषाणू हवेतूनच संक्रमित करतो.

श्रीलंकेच्या जयवर्धनपुरा विद्यापीठाच्या इम्यूनोलॉजी आणि आण्विक विज्ञान विभागाच्या प्रमुख नीलिका मालाविगे यांनी शनिवारी सांगितले की, हा विषाणू अतिशय सहज आणि त्वरीत पसरतो. कारण तो एक तास हवेमध्ये राहते. ते म्हणाले की श्रीलंकेत सापडलेल्या सर्व प्रकारांपैकी कोरोनाचा हा प्रकार सर्वात प्राणघातक आणि जलद पसरु शकतो.

गेल्या आठवड्यात हा विषाणू पसरु लागला आहे. याचा संसर्ग युवकांमध्ये पसरतोय. सार्वजनिक आरोग्य निरीक्षक उपल रोहाना सांगतात की येत्या दोन-तीन आठवड्यांत संसर्ग अजून वाढू शकतो. ज्यामुळे तिसरी लाट येऊ शकते.

दरम्यान, कोविडपासून संरक्षण करण्यासाठी 31 मे पर्यंत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले जातील. ते म्हणाले की, पहिल्या संसर्गाची लक्षणे इतकी स्पष्ट नव्हती. पण आता संक्रमण तरुणांमध्ये अधिक दिसून येत आहे.

Read More