Marathi News> विश्व
Advertisement

जगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर; तर बळींची आकडा २ लाखांपार

जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर; तर बळींची आकडा २ लाखांपार

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या 24 तासांत 81 हजार 849 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेसारखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या 9 लाख 60 हजार 896वर गेली असून आतापर्यंत 54 हजार 840 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देश आहे. शनिवारी अमेरिकेत 1258 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यातील मृत्यू झालेल्यांपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे.

इटलीमध्ये 1 लाख 95 हजारांवर कोरोनाबाधित असून 26 हजार 640 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये 2 लाख 23 हजार 759 लोकांना कोरोनाची लागण झाली असून स्पेनमध्ये 22 हजार 902 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर फ्रान्समध्ये 1 लाख 61 हजार 488 कोरोनाग्रस्त असून 22 हजार 614 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

 

ब्रिटनमध्ये 20 हजार 319 लोक कोविड-19 मुळे दगावले आहेत. कोरोना व्हायरसमुळे 20 हजारांवर लोकांचा मृत्यू होणं हा राष्ट्रासाठी अत्यंत दु:खद दिवस असल्याचं, इंग्लंडचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे संचालक स्टीफन पॉव्हिस (Stephen Powis) यांनी शनिवारी सांगितलं.

जगात आतापर्यंत 28.50 टक्के लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 27 हजार 892वर गेला आहे. तर भारतात 872 जण कोरोनामुळे दगावले आहे. देशात 6 हजार 184 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read More