Marathi News> विश्व
Advertisement

जगभरात २१० देशांत कोरोनाची लागण, १.५३ लाखांहून अधिक जणांना मृत्यू

जगभरात जवळपास २१० देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.  

जगभरात २१० देशांत कोरोनाची लागण, १.५३ लाखांहून अधिक जणांना मृत्यू

वॉशिंग्टन : जगभरात जवळपास २१० देशांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने बलाढ्य देशांच्या नाकी नऊ आणले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाही. जगभरात जवळपास २२ लाख ४० हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे १ लाख ५३ हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिका, इटली, स्पेन आणि फ्रान्स हा देशांना बसला आहे. एकट्या अमेरिकेत कोरोनामुळे ३७ हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर जवळपास ७ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेपाठोपाठ इटलीत जवळपास २२ हजारांहून अधिक जणांचा बळी गेले आहेत. तर  १ लाख ७२ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 

तर स्पेनमध्ये २० हजारांहून अधिक बळी गेले असून कोरोनाबाधितांची संख्या ही १ लाख ९० हजार आहे. अमेरिका, इटली आणि स्पेन व्यतिरिक्त आणखी अन्य देशातही कोरोनाचे बळी जात आहेत.

Read More