Marathi News> विश्व
Advertisement

Russia Ukraine War: कोण आहे युक्रेनी सैनिकांची कर्दनकाळ ठरलेली 'बघिरा'

Russia Ukraine War: रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेक गोष्टी समोर येत आहेत. रशियाच्या लष्करात महिलांचाही सामावेश आहे. या महिला जवान प्रत्यक्ष युद्धातही शत्रुला सळो की पळो करून सोडतात. 

Russia Ukraine War: कोण आहे युक्रेनी सैनिकांची कर्दनकाळ ठरलेली 'बघिरा'

मॉस्को : युद्धात शत्रुला धडकी भरवणारी तसेच त्यांवर त्वेषानं चाल करून जाणाऱ्या महिला जगभरातील लष्करात कमीच आहेत. अनेक देशांमध्ये तर लष्करात महिलांची भरतीच होत नाही. मात्र काही देश त्याला अपवाद आहे. असाच देश म्हणजे रशिया होय. रशियामध्ये महिलांना लष्करात देश सेवेची संधी दिली जाते. 

सध्या युक्रेन - रशिया युद्धामध्येही अनेक रशियन महिला सहभागी आहेत. शत्रुपक्षाच्या सैनिकांना त्यांनी घायाळ केलं तसंच अनेकांना ठार केलं आहे. त्यातलं एक जगभरात चर्चेत असलेलं नाव म्हणजे इरिना स्टारिकोवा (irina starikova) होय. शार्प शुटर असलेली इरिना युक्रेन देशासाठी वॉन्टेड आहे. ती गेल्या अनेक वर्षापासून युक्रेनच्या हाती लागली नव्हती.

आता सुरू असलेल्या युद्धातही तीने थेट चाळीस युक्रेनी सैनिकांना कंठस्नान घातले आहे. अनेकांना गंभीर जखमी केलं आहे. परंतू युक्रेनी सैनिकांशी दोन हात करताना गंभीर जखमी अवस्थेत तिला जिवंत पकडण्यात आलं आहे. युक्रेनी सैनिकांना ती जिवंत हाती लागल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

इरिना या रणरागिनीचं लष्करातील सांकेतिक नाव 'बघिरा' आहे. ती युक्रेनच्या अंतर्गत भागात शिरून युक्रेनी सैनिकांचा संहार करीत होती. लढता लढता ती गंभीर जखमी झाली. रशियन सैनिकही तिला गंभीर जखमी अवस्थेत सोडून गेले. परंतू युक्रेनी सैनिकांच्या ती जिवंत हाती लागली. तिला त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

तिला युक्रेनी सैनिकांनी रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांना वाटलं की, ती रशियाची सामान्य महिला सैनिक आहे. परंतू तिची चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की, खतरनाक शार्प शूटर इरिना स्टारिकोवा आहे. 2014 पासून युक्रेनी सरकार तिच्या शोधात होतं. युद्ध सुरू होण्यापूर्वी ती युक्रेनमधील फुटरतावद्यांना हाताशी धरून युक्रेनी सैनिकांवर हल्ले करीत होती. अनेक सैनिकांना तिने ठार केलंय. 

रशियन सैन्यात दाखल होण्यापूर्वी ती नन होती. तिला दोन मुलीदेखील आहेत. तिच्या पतीशी तिचा घटस्फोट झाला आहे. इरिना मुळची सर्बियाची असून इरिनाला पकडल्यानंतर युक्रेनने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

Read More