Dog Mika R Linkedin Profile : गेल्या काही दिवसांपासून मीका R नावाची एक श्वान चर्चेत आहे. त्याचं कारण त्याचं LinkedIn प्रोफाइल आहे. प्रोफाइलमध्ये या श्वानला चीफ डॉग ऑफिसर म्हटलं आहे. या श्वानचा मालक अस्साफ रॅपापोर्टची कंपनी Wiz नं गूगलसोबत एक मोठी डील केली आहे. गूगल आता Wiz ला 32 अब्ज डॉलरला विकत घेणार आहे. मात्र, हे सगळं पाहण्यासाठी आता मीका R जिवंत नाही. अस्साफ रैपापोर्टच्या कंपनीच्या CEO आणि को-फाउंडर असताना, त्यानं त्याची श्वान Wiz ची 'चीफ डॉग ऑफिसर' म्हणून नियुक्त केली होती. गूगल आणि Wiz च्या डीलनंतर मीका R चं LinkedIn प्रोफाइल आता चर्चेत आलं आहे.
Wiz एक आयटी सिक्योरिटी कंपनी आहे. ती क्लाउड सिक्योरिटी संबंधित सिक्योरिटी प्रदान करते. फक्त पाच वर्षांत Wiz नं मोठ्या कंपन्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. गूगल गेल्या वर्षीपासून Wiz ला विकत घेण्याचा विचार करत होती, पण कंपनीच्या बोर्डनं सुरुवातीला त्यासाठी नकार दिला होता. आता गूगलनं 32 अब्ज डॉलरमध्ये डील केली आहे. ही संपूर्ण डील आता कॅशमध्ये म्हणजे रोख रक्कमेत होणार असून 2026 पर्यंत ती पूर्ण होईल.
Wiz ची स्थापना 2020 मध्ये अस्साफ रॅपापोर्ट आणि त्याच्या इस्रायल सहकाऱ्यांनी केली. तेव्हा मीका R जिवंत होती आणि कंपनीमध्ये तिचं महत्त्व होतं. तिचं LinkedIn प्रोफाइल तयार करून तिला 'चीफ डॉग ऑफिसर' बनवण्यात आलं होतं.
मीका कंपनीच्या मालकांबरोबर प्रवास करायची. अस्साफ रॅपापोर्टने कर्मचाऱ्यांना सांगितलं की, ते त्यांच्या पाळीव प्राण्यांना ऑफिसमध्ये आणू शकतात, ज्यामुळे वातावरण आनंदी राहील.
मीका R चे निधन गेल्या वर्षी झालं. तिच्या मृत्यूनंतर अस्साफ रॅपापोर्टने सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली होती. रिपोर्ट्सनुसार, मीका R नं 'बार्किंग' मध्ये बॅचलर ऑफ सायन्स डिग्री घेतली होती, जे तिच्या LinkedIn प्रोफाइलला आणखी छान वाटावं यासाठी करण्यात आलं होतं.
गूगल Wiz विकत घेऊन क्लाउड सर्विसेसमध्ये आपली स्थिती मजबूत करू इच्छित आहे. सध्या या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे आणि जेनरेटिव एआयमुळे नवीन कंपन्यांची संख्याही वाढली आहे. गूगलला विश्वास आहे की Wiz विकत घेतल्यामुळे ती क्लाउड सर्विसेस मार्केटमध्ये आपली स्पर्धात्मक स्थिती मेन्टेन करू शकेल.