Marathi News> विश्व
Advertisement

ट्रम्प यांच्या जुन्या अफेअरचा नव्याने भांडाफोड, Playboy मॉडेलसोबत होते लैंगिक संबंध

अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व असूनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका अफेअरचा भांडाफोड झाला आहे.

ट्रम्प यांच्या जुन्या अफेअरचा नव्याने भांडाफोड, Playboy मॉडेलसोबत होते लैंगिक संबंध

वॉशिंग्टन : अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व असूनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका अफेअरचा भांडाफोड झाला आहे. Playboy या जगप्रसिद्ध मासिकाची माजी मॉडेल राहिलेल्या केरन मॅडोगुलने या अफेअरवरचा पडदा बाजूला सारला आहे.

९  सुरू होते महिने लैंगिक संबंध

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी भुतकाळात लैंगिक संबंध असल्याचा दावा करणारी केरन ही दुसरी महिला आहे. ट्रम्प आणि आपल्यात साधारण ९ महिने लैंगिक संबंध सुरू होते, असा दावा केरनने केला आहे. २००६मध्ये ट्रम्प आणि आपल्यात लैंगिक संबंध होते. मेलानिया ट्रम्प यांनी मुलांना जन्म देण्याच्या काही महिन्या नंतरची ही गोष्ट असल्याचा दावाही केरन करते.

व्हाईट हाऊसवरून कोणतीही प्रतिक्रीया नाही

दरम्यान, केरनच्या दाव्यावर व्हाईट हाऊसवरून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, नाव न घेण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ट्रम्प यांचे कोणत्याही महिलेशी अशा प्रकारचे संबंध नव्हते. तसेच, अशा प्रकारच्या येत असलेल्या बातम्या फेक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफर्डनेही केला होता आरोप

एकेकाळची पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफर्ड हिनेही ट्रम्पनी आपल्यासोबत एक रात्र लैंगिक संबंध ठेवल्याचे म्हटले होते. तसेच, या संबंधाची कोटेही वाच्यता होऊ नये, यासाठी ट्रम्प यांच्या वकीलाने तिला १३०,००० डॉलर म्हणजेच ८२ लाख ६४ हजार ७५० रूपये दिल्याचा दावाही स्टेफनी हिने केला होता.

Read More