Donald Trump on India Pakistan : जम्मू - काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्या करुन 26 जणांचा नाहक बळी घेतला. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अर्तंगत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. त्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या दोन देशामधील संघर्ष पाहता एकाप्रकारे युद्धपरिस्थिती निर्माण झाली होती. अशातच भारत पाकिस्तानमधील संघर्ष थांबावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असा दावा केला. सध्या भारत पाकिस्तानमधील तणाव निवळला असे चिन्ह असताना आज (12 मे 2025) ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा श्रेय घेण्याच्या शर्यतीत उडी घेतली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारत आणि पाकिस्तानला सांगितलं होतं की जर संघर्ष थांबला नाही तर आम्ही व्यापार करणार नाही. ट्रम्प म्हणाले, 'शनिवारी, माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये तात्काळ युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली, मला वाटते की ही कायमस्वरूपी युद्धबंदी असेल... दोन्ही देशांमध्ये भरपूर अण्वस्त्रे आहेत.'
#WATCH | US President Donald Trump says, "...On Saturday, my administration helped broker an immediate ceasefire, I think a permanent one between India and Pakistan - the countries having a lot of nuclear weapons..."
— ANI (@ANI) May 12, 2025
(Source - White House/Youtube) pic.twitter.com/4q5LXFhtZ4
ते म्हणाले, मला अभिमानाने सांगायचं आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नेत्यांचा दृष्टिकोन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्यासाठी दृढ आणि प्रभावी होता. शांतता पुनर्संचयित करण्यात अमेरिकेने मोठी भूमिका बजावली आणि व्यापाराचा शस्त्र म्हणून वापर केला. आम्ही खूप मदत केली आणि व्यापाराच्या माध्यमातूनही मदत केली. मी दोन्ही देशांना सांगितलं, जर तुम्ही लोक लढणे थांबवले तर आपण व्यापार करु. जर तुम्ही ते केले नाही तर कोणताही व्यवसाय होणार नाही. ट्रम्प यांनी असा दावा केला की माझ्यासारखा व्यवसाय इतर कोणीही वापरला नाही. आणि मग अचानक ते म्हणाले, ठीक आहे, आपण थांबणार आहोत, आणि त्यांनी खरंच थांबलं.