Marathi News> विश्व
Advertisement

आशियाई देशांवर ट्रम्प यांचा प्रहार; 14 देशांना कराचा भुर्दंड, भारताच्या...

USA Tariff Donald Trump : जागतिक घडामोडींमध्ये दर दिवशी या न त्या कारणानं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव चर्चेचा विषय ठरत असतं.   

आशियाई देशांवर ट्रम्प यांचा प्रहार; 14 देशांना कराचा भुर्दंड, भारताच्या...

USA Tariff Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या क्षणापासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी अके काही लक्षवेधी निर्णय घेतले, ज्यांची जागतिक स्तरावर चर्चा झाली. त्यापैकीच एक निर्णय होता, आयातशुल्कासंदर्भातला. चीनसोबत अमेरिकेचं आयात शुल्कामुळं सुरू असणारं द्वंद्व काही संपण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता या महासत्ता राष्ट्रानं आशियाई देशांनासुद्धा हादरा दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

7 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं पाऊल उचलत दक्षिण कोरिया, जपान, म्यानमार, लाओस, दक्षिण आफ्रिका, कझाकिस्तान, मलेशिया इथून आयात होणाऱ्या गोष्टींवर प्रचंड प्रमाणात आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आशियाई देशांची संख्या तुलनेनं अधिक असल्याचं पाहायला मिळालं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रम्प यांनी ही घोषणा केली असून, या निर्णयाच्या माध्यमातून अमेरिका आणि इतर देशांमध्ये सद्यस्थितीला व्यापारातील घट कमी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं स्पष्ट केलं. 'स्वीकारा किंवा विषय सोडा...' अशाच इशाऱ्यासह या देशांना ट्रम्प सरकारनं हे पत्रक जारी केलं असून चर्चांना वेग देत आयात शुल्क प्रणाली लागू करण्याच्या दृष्टीनं कैक हालचाली स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. 

ट्रम्प यांची अट काय? 

अमेरिका या देशांसोबत व्यापार करण्यात तयार असून, तो अधिक निष्पक्ष आणि संतुलित असावा इतकीच अट असल्याचं ट्रम्प म्हणाले. आपल्या वक्तव्यात ते म्हणाले, 'आम्ही दक्षिण कोरिया आणि जपानसोबतच्या व्यापारामध्ये बऱ्याच काळापासून तोटा सहन करत आहोत. त्यामुळं टॅरिफमध्ये असणारं असंतुलन कमी करण्यासाठी हे एक प्राथमिक पाऊल आहे, जेणेकरून अमेरिकी व्यापार आणि श्रमिकांना योग्य ती संधी मिळू शकेल.'

कोणकोणत्या देशांना आयात शुल्क भरावं लागणार?

सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यावर 25-25 टक्के आयातशुल्क लावण्याची घोषणा केली होती. यानंतर काही तासांनीच म्यानमार, लाओस, दक्षिण आफ्रिका, कझाकिस्तान आणि मलेशियावरही आयात शुल्क आकारणार असल्याची घोषणा केली. इतक्यावरच न थांबता ट्रम्प सरकारनं ट्यूनिशीया, इंडोनेशिया, बोस्नियास बांगलादेश या भारताच्या शेजारी राष्ट्रासह सर्बिया, कंबोडिया, थायलंडवरही आयात शुल्क लागू केलं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती जारी करत ट्रम्प सरकारनं सांगितल्यानुसार 1 ऑगस्टपासून नवी आयात शुल्कप्रणाली लागू होणार असून, त्यासंदर्भात कोरिया आणि जपानला आधीपासूनच पत्र पाठवण्यात येत आहेत. दरम्यान ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अमेरिकी शेअर बाजारामध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या असून वॉल स्ट्रीटच्या प्रमुख सूचकांकांमध्येही मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. 

Read More