Marathi News> विश्व
Advertisement

'सुनिता विलियम्स आम्ही येतोय!' यापुढे डोनाल्ड ट्रम्प जे म्हणाले त्याचीच जास्त चर्चा

US President Donald Trump on Sunita Williams return journey : सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासासंदर्भात President Trump यांनी दिली मोठी अपडेट. भारतीय वंशाच्या विलियम्स यांना उद्देशून केलं लक्षवेधी वक्तव्य...   

'सुनिता विलियम्स आम्ही येतोय!' यापुढे डोनाल्ड ट्रम्प जे म्हणाले त्याचीच जास्त चर्चा

US President Donald Trump on Sunita Williams return journey : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि नासामधील त्यांचे सहकारी बुच विल्मोर मागील कैक महिन्यांपासून स्टारलायनर या त्यांच्या अवकाशयानातील बिघाडामुळं पृथ्वीपासून कैक मैल दूर अडकले आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सध्या हे अंतराळवीर आपला वेळ व्यकीत करत असून, त्यांच्या परतीच्या प्रवासासंदर्भात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

ओवल ऑफिस या आपल्या कार्यालयातून ट्रम्प यांनी हा संवाद साधला. जिथं त्यांनी आपण विलियम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर माघारी आणण्यासठीचे प्रयत्न करत असून, हे प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यात असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणांवरही ट्रम्प यांनी निशाणा साधला. माध्यमांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, ''आमच्याकडे दोन अंतराशवीर आहेत जे तिथं अडकले आहेत. त्यामुळं मी एलन (मस्क)ना म्हटलं, 'माझं एक काम करू शकता, त्यांना तिथून पृथ्वीवर आणू शकता? यावर मस्क यांचं उत्तर होत हो.' आता ते त्याचीच तयारी करत आहेत.'' 

अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासासंदर्भात माहिती देताना त्यांनी अचानक सुनिला विलियम्स यांच्याविषयीसुद्धा वक्तव्य केलं. इथं त्यांनी चक्क विलियम्स यांच्या केसांचं कौतुक केलं. मी त्या एका महिलेला पाहतोय जिचे केस अतिशय दाट आहेत, खूपच छान... त्यांच्या केसाशी हेळसांड किंवा कोणताही खेळ नको... असं म्हणत त्यांनाही विलियम्स यांच्या सुरेख केसांचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखता आलं नाही. 

हेसुद्धा वाचा : अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील 'त्या' पुराव्यानं सारं जग थक्क 

अवकाशात अडकलेल्या विल्मोर आणि विलियम्स यांना तुम्ही काय संदेश द्याल? असा प्रश्न विचारला असता, 'आम्ही तुम्हाला घ्यायला येतोय...मुळात तुम्ही तिथे इतका वेळ राहाणंच अपेक्षित नव्हतं' असं म्हणत त्यांनी बायडेन यांच्यावर निशाणा साधला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्सची मालकी असणाऱ्या एलॉन मस्क यांच्याकडे ट्रम्प यांनी नासाच्या या दोन अंतराळवीरांना माघारी आणण्याची जबाबदारी सोपवली. तेव्हा आता सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधी परत येतात याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

 

Read More