Stock Market Updates: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्या या धोरणामुळं जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बदला. नव्या आर्थिक वर्षापासून भारतातही याचे परिणाम दिसून आलेय तर, आशियाई शेअर बाजारातही ट्रम्प शासनाच्या निर्णयाचे पडसाद उमटले. एकिकडून जागतिक आर्थिक मंदीचं सावट आणखी गडद होत असतानाच दुसरीकडून जगभरातील अनेक देशांनी या धोरणाचा कडाडून विरोध केला. ज्यानंतर 10 एप्रिल रोजी पुन्हा एकदा शेअर बाजारात महत्त्वाच्या घडामोडींनी वेग धरला. जिथं आशियाई शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. यामागचं कारणही ठरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आणखी एक निर्णय.
ट्रम्प यांनी एकाएकी बहुतांश ट्रेडिंग पार्टनर अर्थात अनेक राष्ट्रांवर लावलेल्या इम्पोर्ट टॅरिफ म्हणजेच आयात शुल्कावरील नियमांवर 90 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती आणली. चीन आणि हाँगकाँगला मात्र या यादीतून वगळण्यात आलं आणि आणखी एक अट म्हणजे 10 टक्के आयात शुल्काची अट मात्र जै से थे ठेवण्याची. त्यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जपान आणि कोरियातील शेअर बाजारावर दिसून आला. जिथं जपानमध्ये Nikkei 225 इंडेक्स 8.66% नं वधारून 34,450 वर पोहोचला. तर, कोरियाता Kospi 5.69% नं उसळी घेऊन थेट 2,424.08 चा आकडा गाठताना दिसला.
फक्त आशियाच नव्हे, तर तिथं ऑस्ट्रेलियातही S&P/ASX 200 नंसुद्धा 4.69% ची वाढ घेतल्याचं पाहायला मिळालं. हाँगकाँगच्या Hang Seng इंडेक्स 1.8% ची उसळी घेत हे आकडे 20,628.86 वर पोहोचले.
दरम्यान 90 दिवसांसाठी आयात शुल्कासंदर्भातील या निर्णयाला स्थगिती देत X पोस्टच्या माध्यमातून म्हटलं, '75 हून अधिक देशांनी अमेरिकी आयात शुल्काच्या धोरणावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलीच. या देशांनी प्रत्युत्तराचं पाऊल न उचलता अमेरिकेसह सामंजस्याच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळं या देशांना 90 दिवसांसाठी या करातून सूट दिली जात आहे'. या भूमिकेसह ट्रम्प यांनी चीनच्या बाबतीत मात्र परखड भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं.
एकिकडे चीननं ट्रम्प यांचा रोष ओढावत जागतिक व्यापार युद्धाला हवा मिळालेली असतानाच दुसरीकडे या साऱ्यातच चीनमध्येही गुंतवणुकदारांना काही अंशी दिलासा मिळाला. कारण, चीनच्या Shanghai Composite Index मध्ये 0.93% आणि Shenzhen Index मध्ये 2.5% ची तेजी पाहायला मिळाली. तुलनेनं आशियाई अर्थव्यवस्थेवर जास्त आणि जगातील इतर देशांमध्येही दिलासायक प्रमाणात ट्रम्प यांच्या या 'दिलासादायक' निर्णयाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.