मुंबई : लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती, नाच गाणी सगळं काही येतं. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी नवरदेव आणि नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. काही लोकं या सोहळ्यातील सुंदर, आनंदी आणि मजेदार क्षणं सोशल मीडियावर देखील शेअर करतात. यावेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये वधू-वर (Groom-Bride) स्टेजवर नातेवाईकांसोबत उभे असल्याचे दिसत आहे. दोघांनी काही विधी पार पाडले असतील किंवा काही खेळ खेळला असेल असे दिसते. पण पुढच्या क्षणी स्टेजवर काय होणार आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती.
वधू हा गेम जिंकते आणि हे पाहून वर चिडचिड करतो. त्यानंतर चिडलेला वर असे कृत्य करतो ज्यामुळे वधूचा अपमान तर होतोच शिवाय दोघांचा खास दिवसही खराब होतो. वराने वधूवर हात उगारला. हे पाहून तिथे उपस्थित लोकांनाही आश्चर्य वाटले. वराच्या या कृत्याने वधूही खूप घाबरली आणि तिच्या मैत्रिणीसोबत स्टेज सोडू निघून गेली. हा व्हिडीओ जो कोणी पाहतोय, त्याला वराचा राग येतोय.
Horrifying moment groom beats his new wife at their WEDDING after flipping when his bride won a game on stage during toast in Uzbekistan
— MassiVeMaC (@SchengenStory) June 13, 2022
The newlyweds were on-stage playing a game as their guests cheered them on
But when the bride won the game, the groom lashed pic.twitter.com/KPL0RlrjcT
एका नेटकऱ्याने तर वराला 'तू माणूस नाही' असे म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा भयानक क्षण, गेम हरल्यानंतर वराने नववधूला कानशिलात लगावली. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी लिहिलं की वर इतका उद्धट आहे तर काहींनी असा वर कुणाला मिळू नये असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ उझबेकिस्तानचा आहे.