Eggs thrown on King Charles: ब्रिटनच्या यॉक सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. किंग चार्ल्स बुधवारी यॉर्क शहरात 'मिकलेगेट बार लँडमार्क' येथे लोकांना अभिवादन करत असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतलं होतं. पॅट्रिक थेलवेल असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून 23 वर्षांचा आहे. पॅट्रिकला कायदा सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर पॅट्रिकला कोर्टात दाखल केल्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
'द मिरर'मधील वृत्तानुसार, किंग्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला यांच्यावर अंडी फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोर्टानं आरोपीला सार्वजनिक ठिकाणी अंडी नेण्यास बंदी घातली आहे. त्याचबरोबर किंग्स चार्ल्सपासून 500 मीटर लांब राहण्याची सूचना केली आहे. सध्या आरोपीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. जमावाने चिथावणी दिल्यानंतर असं कृत्य केल्याची बाजू आरोपीने कोर्टात मांडली. या घटनेनंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Video
— Just Event Online Publication (@justeventsonlin) November 9, 2022
Egg thrown at “King” Charles during a a visit to York as man detained by police.
The protester was arrested while screaming “this country was built on slavery” pic.twitter.com/5A7juC3ZOS
जामीन मिळाल्यानंतर पॅट्रिकनं सांगितले की, 'माझ्यावर जमावाने हल्ला केला. लोकांनी मला खलनायक बनवले. त्या दिवशी कोणीतरी माझे केस पकडून ठेवले होते आणि कोणीतरी मला मारत होतं. एका माणसाने माझ्यावर थुंकलं. माझे वकील चांगले होते आणि त्यांनी मला वाचवले. सोशल मीडियावरही लोक मला धमक्या देत आहेत.'