Marathi News> विश्व
Advertisement

ठाऊक नाही, 13 वं मूल माझं आहे की...; म्हणूनही मस्क या तरुणीला देत आहेत 25 लाख डॉलर

Elon Musk denied allegations from influencer : एलॉन मस्क यांच्या खासगी जीवनाविषयी आणखी एक धक्कादायक माहिती समोर. धनाढ्य व्यक्तीनं स्वत:च सांगितलं...   

ठाऊक नाही, 13 वं मूल माझं आहे की...; म्हणूनही मस्क या तरुणीला देत आहेत 25 लाख डॉलर

Elon Musk denied allegations from influencer : टेस्ला आणि स्पेसएक्स यांसारख्या कंपन्यांची मालकी असणाऱ्या एलॉन मस्क या जगातील श्रीमंत व्यक्तीनं पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. मस्क यांच्या 13 बाळाची काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, कथित स्वरुपात या बाळाच्या संगोपनासाठी मस्क यांनी इन्फ्लुएंसर एश्ले सेंट क्लेयरला 2.5 मिलियन डॉलर म्हणजेच साधारण 21 कोटी रुपये देऊ केले आहेत. 

खुद्द मस्क यांनीसुद्धा या मुद्द्यावर भाष्य करताना हे 13 वं बाळ आपलं आहे की नाही हे ठाऊक नाही. मात्र, तरीही त्याच्या संगोपनासाठी इन्फ्लुएंसरला आपण दरवर्षी 500,000 डॉलर पाठवत असल्याचं सांगत आपण बाळाच्या संगोपनासाठीच्या खर्चात कपात केल्याची सर्व वृत्त मस्क यांनी फेटाळून लावली. इन्फ्लुएंसर एश्ले सेंट क्लेयरच्या आरोपांनंतर त्यांनी ही भूमिका मांडली. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून मस्क स्पष्टच म्हणाले... 

31 मार्च रोजी मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून 'हे मूल माझं आहे की नाही हे मला ठाऊक नाही' अलं म्हणत या मुलाबाबत संपूर्ण माहिती नसतानाही आपण एश्लेला एक मोठी रक्कम दिल्यचं सांगत त्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं. टेस्ला आणि स्पेसएक्सच्या सीईओपदी असणाऱ्या लॉरा लूमरनं पोस्ट केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : हेच राहिलेलं; Facebook, Instagram वापरण्यासाठीसुद्धा आता पैसे मोजावे लागणार? नवं धोरण पाहाच 

मस्क यांच्या जीवनात उलथापालथ करणारी एश्ले आहे तरी कोण? 

एशले सेंट क्लेयर (Ashley St Clair) हे नाव किंबहुना ही युट्यूबर मस्क यांच्या 13 व्या बाळाला आपण जन्म दिल्याचं सांगत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 14 फेब्रुवारी 2025 ला तिनं एक्सच्या माध्यमातून पोस्ट करत एकच खळबळ माजवली होती. बाळाच्या सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी आपण यापूर्वी त्याच्यासंदर्भातील हा खुलासा केला नव्हता असं कारण तिनं पुढं केलं होतं. 

Read More