Marathi News> विश्व
Advertisement

ट्रम्प यांना मोठा धक्का! जगातील सर्वात श्रीमंत पाठीराख्याने सोडली साथ; तडकाफडकी राजीनामा

Donald Trump Government: ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

ट्रम्प यांना मोठा धक्का! जगातील सर्वात श्रीमंत पाठीराख्याने सोडली साथ; तडकाफडकी राजीनामा

Donald Trump Government: 'टेस्ला'चे विशेष कार्यकारी अधिकारी तसेच खासगी अंतराळ संस्था 'स्पेस एक्स'चे संस्थापक एलॉन मस्क यांनी गुरुवारी पहाटे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. आपल्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरुन केलेल्या एका पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिली. यूएस डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सीचं प्रमुख पद मस्क यांनी सोडलं आहे. ही घोषणा करताना त्यांनी, "...विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा नियोजित वेळ संपत आहे," असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांचे मानले आभार

मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. "सरकारकडून होणारा व्यर्थ खर्च कमी करण्याची" संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे, अशा शब्दांमध्ये मानले. "विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा नियोजित वेळ संपत असताना, मी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यर्थ खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानू इच्छितो," मस्क यांनी एक्सवर पोस्ट केले.

आपल्या विभागाबद्दल व्यक्त केला 'हा' विश्वास

"डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी मिशन कालांतराने अधिक मजबूत होईल कारण ते संपूर्ण सरकारमध्ये जीवनशैलीचा एक भाग बनेल," अशी अपेक्षा मस्क यांनी व्यक्त केली आहे. खरं तर इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू मानले जातात. मात्र, आता इलॉन मस्क यांनी आपण ट्रम्प प्रशासन सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग

ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये नवीन टॅरिफ धोरण, बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, अमेरिकेतील कर्मचारी कपात, हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भातील मुद्दा अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. ट्रम्प सरकारमध्ये उद्योगपती इलॉन मस्क यांची देखील महत्वाची भूमिका असल्याचं मानलं जातं.

ट्रम्प समर्थक

ट्रम्प यांनीच दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मस्क यांनी विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती. ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयामध्ये मस्क यांचा मोठा हातभार असल्याचं सांगितलं जातं. अगदी सोशल मीडियावरील चर्चासत्रापासून ते प्रत्यक्षात निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होण्यापर्यंत मस्क यांनी उघडपणे ट्रम्प यांना समर्थन केल्याचं पाहायला मिळालं आहे. देणगी स्वरुपातही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्रम्प यांच्या पक्षाला मोठी मदत केल्याचं सांगितलं जातं.

Read More