Marathi News> विश्व
Advertisement

Elon Musk यांचा जीव धोक्यात? मृत्यूबाबत केलेलं ट्विट चर्चेत

दरम्यान एलन मस्क यांचं हे ट्विट चांगलंत व्हायरल झालं असून ते खूप चर्चेत आहे. 

Elon Musk यांचा जीव धोक्यात? मृत्यूबाबत केलेलं ट्विट चर्चेत

मुंबई : टेस्लाचे सीईओ एलन मस्क नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. नुकतेच त्यांचं एक ट्विट पुन्हा चर्चेचं कारण बनलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आपल्या 'संशयास्पद मृत्यू'बद्दल म्हटलंय. यानंतर लोकांनी त्यांच्या या ट्विटवर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी नुकतंच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतलंय.

मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये, जर माझा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर... तुम्हाला हे जाणून घ्यायला आनंद होईल. एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसंच टेस्ला इंक.चे सीईओ आणि द बोरिंग कंपनी तसंच स्पेसएक्स या दोन अन्य कंपन्यांचे प्रमुख आहेत.

दरम्यान एलन मस्क यांचं हे ट्विट चांगलंत व्हायरल झालं असून ते खूप चर्चेत आहे. या ट्विटनंतर विविध चर्चांना उधाण आलंय. मस्क यांच्या ट्विटनंतर युजर्सही चांगलेच गोंधळात सापडलेत. मात्र मस्क यांच्या या ट्विटचा अर्थ कोणालाही कळलेला नाहीये. 

एलन मस्क यांनी नुकतचं अलिकडेच ट्विटर खरेदी केलं आहे. दरम्यान ट्विटरच्या खरेदीनंतर त्यांनी स्पष्ट केलंय की, येत्या काळात ट्विटर वापरण्यासाठी युजर्सना शुल्क द्यावं लागेल. एलन मस्क यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. 

Read More