Marathi News> विश्व
Advertisement

एलॉन मस्क झाला 14 मुलांचा बाप, 13 व्या मुलाच्या वाढदिवशीच शेअर केली Good News, नाव ठेवलं...

Elon Musk Children: एलॉन मस्क झाला 14 व्यांदा बाबा. 13व्या मुलाच्या वाढदिवसादिवशीच त्याने ही गोड बातमी शेअर केली आहे. 

एलॉन मस्क झाला 14 मुलांचा बाप, 13 व्या मुलाच्या वाढदिवशीच शेअर केली Good News, नाव ठेवलं...

Elon Musk Children: टेस्लाचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क पुन्हा चर्चेत आला आहे. एलॉन 14व्यांदा बाबा झाला आहे. लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त ही गुडन्यूज त्याने शेअर केली आहे. यापूर्वी एलॉनला 13 मुलं आहे. मागील वर्षीच एलॉन आणि त्याची प्रेयसी शिवॉन गिलिस यांनी एका मुलाला जन्म दिला होता. 

न्युरोलिंक एक्झिक्युटिव्ह शिवॉन गिलिस आणि एलॉन मस्क हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. शिवॉन आणि मस्क यांना आधीच तीन मुलं आहे. त्यांचा तिसरा मुलगा आर्केडियाच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी घरातील नवीन सदस्याच्या आगमनाची बातमी शिवॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. 

शिवॉन यांनी एक्वर एक पोस्ट केली आहे. त्यावर त्यांनी म्हटलं आहे की, एलॉनसोबत बोलल्यानंतर आम्ही आर्केडियाच्या वाढदिवसाइतका सुंदर क्षण आमच्या नवजात मुलाच्या घोषणा करण्यासाठी

मी आणि एलॉनने चर्चा केल्यानंतर आम्हाला जाणवले की आर्केडियाच्या वाढदिवसाइतका सुंदर दिवस कोणताही नाही. त्यामुळं त्याचदिवशी आम्ही आमच्या नवजात बाळाच्या नावाची घोषणा करत आहोत. आमच्या बाळाचा नाव Seldon Lycurgus असं आम्ही ठेवलं आहे. आमचं त्याच्यावर खूप प्रेम आहे, असं शिवॉनने तिच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर शिवॉनच्या एक्सपोस्टवर एलॉन मस्क यांनी हार्टची इमोजी टाकच रिप्लाय केला आहे. 

दरम्यान, शिवॉन आणि मस्क या दोघांनीही त्यांचा तिसऱ्या आणि चौथ्या मुलाबाबतची माहिती आत्तापर्यंत गोपनीय ठेवली आहे. रिपोर्ट्सनुसार, 2024च्या सुरुवातीला दोघांनी आर्केडियाला जन्म दिला होता. त्याच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी त्याच्या मुलाच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 

14 मुलांचा बाप

एलॉन मस्कला आधीच्या लग्नापासून 6 मुलं आहेत. त्यांचा पहिला मुलगा, नेवाडा अलेक्झांडर 2002 मध्ये जन्माला आला होता. मात्र 10 आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला झेवियर आणि डॅमियन अशी जुळी मुलं झाली. यानंतर त्याला काई, सॅक्सन आणि डॅमियन अशी तीन मुलं झाली. 2020 मध्ये संगीतकार ग्रिम्स हिने इलॉन मस्कच्या एका मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर शिवॉन आणि मस्क यांना पहिले जुळी मुलं झाली होती. त्यानंतर 2024मध्ये शिवॉनने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2025मध्येही शिवॉनने एका मुलाला जन्म दिला आहे. 

Read More