Marathi News> विश्व
Advertisement

7 वर्षांपासून अवकाशात रहस्यमयीरित्या गरगर फिरतेय Elon Musk ची कार; काय आहे खरं कारण?

Where is Tesla Roadster in Space: काय सांगता? गेल्या 7 वर्षांपासून अवकाशात गरगर फिरतेय Elon Musk ची कार? खरं कारण माहितीये? 

7 वर्षांपासून अवकाशात रहस्यमयीरित्या गरगर फिरतेय Elon Musk ची कार; काय आहे खरं कारण?

Where is Tesla Roadster in Space: अवकाशाशी संबंधित बहुतांश रहस्यांचा उलगडा मागील दशकभराच्या काळात झाल्याचं पाहायला मिळालं. आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वासह अवकाशाचं महत्त्वं आणखी वाढतं. याच अवकाशासंदर्भातील एक अनपेक्षित माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. 

तुम्हाला माहितीये का, गुरुत्वाकर्षणाचा अभाव असणाऱ्या अवकाशामध्ये अलिखित नियमानुसार प्रत्येक गोष्ट तरंगते असं म्हणतात. अशा या अवताशात गेल्या 7 वर्षांपासून एक कारसुद्धा तरंगतेय आणि गरगर फिरतेय. विश्वास बसत नाही? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकेतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील नामवंत उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेस एक्स (Space X) या कंपनीनं 7 वर्षांपूर्वी सर्वाधिक कार्यक्षम असे फाल्कन हेवी रॉकेट लाँच केले होते. फक्त रॉकेटच नव्हे, तर त्यासोबत टेस्लाची चेरी रेड रंगाची एक कार टेस्ला रोडस्टर स्टारमॅन डमीसह अवकाशात पाठवण्यात आली होती. तेव्हापासून ही कार तिथंच असून, सूर्याची परिक्रमा करत असल्याचं म्हटलं जात आहे. 

6 फेब्रुवारी 2018 मध्ये मस्कच्या कंपनीची ही कार अवकाशात पाठवण्यात आली. ज्यानंतर तेव्हापासून आतापर्यंतच्या काळात खूप काही घडलं. जगभरात क्रांतीकारी बदल घडले, पण ही कार मात्र अवकाशातच राहिली. या कारचं अवकाशात असणं पूर्णपणे अनपेक्षित असून संशोधकही त्यामुळं संभ्रमात पडले आहेत. मस्कनं पाठवलेली ही कार हल्लीच काही संशोधकांना एक लघुग्रह वाटली. जिथं या कारला Asteroid म्हणून गणलं गेलं. ज्यानंतर एमपीसीनं 3 जानेवारी रोजी एक नोटीस जारी करत पृथ्वीभोवती घिरट्या घालणारी ही वस्तू एक टेस्ला रोडस्टर कार असल्याचं सांगण्यात आलं. 

अवकाशातील प्रत्येक लहानमोठ्या घडामोडींवर संशोधक आणि विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतात. पृथ्वीच्या नजीक किंवा आजुबाजूला असणाऱ्या या संशयास्पद वस्तूंना 'निअर अर्थ ऑब्जेक्ट' असं म्हणतात. मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या या कारवरही खगोल शास्त्रज्ञांनी लक्ष ठेवलं असून, कंपनीनंही त्यासाठी Whereisroadster.com नावाची एक वेबसाईट जारी केली आहे. 

fallbacks

बेन पिअरसन यांनी तयार केलेली ही वेबसाईट कारचं लोकेशन शोधत असून, कारनं आतापर्यंत नेमकं किती अंतर प्रवास केला आहे याची माहिती मिळवते. याच आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या 7 वर्षांच्या प्रवासात टेस्लानं अवकाशात 5.63 लाख कोटी किमी इतका मोठा प्रवास केला आहे. या कारला सूर्याची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 557 दिवसांचा कालावधी लागतो. 

अवकाशात का पाठवली ही कार? 

राहिला प्रश्न ही कार मस्क यांनी ही कार अवकाशात का पाठवली, तर या प्रश्नाचं उत्तर मस्क यांनीच या स्पेसलाँच दरम्यान दिलं होतं. 'आम्हाला आशा आहे की मनुष्य एक दिवस इतर ग्रहांवरही वावरतील. त्यामुळं त्यांचे वंशज या कारला नक्कीच परत आणतील', असं ते म्हणाले होते. इतकंच नव्हे, तर स्पेसएक्स टीमनुसार सर्वात वायफळ गोष्ट ते अवकाशात पाठवू इच्छित होते, ज्यासाठी त्यांनी ही कार पाठवली. ज्यामध्ये चालकाच्या आसनावर क्रॅश टेस्ट डमी लावण्यात आला, ज्याचं नाव होतं स्टारमॅन. प्रत्यक्षात ही कार अवकाशात कोणत्याही हेतूनं किंवा मोहिमेसाठी पाठवण्यात आलेली नाही. 

Read More