'मला स्वतःला अगदी टॉयलेट पेपर सारखं वागणूक देण्यात आली. जेव्हा गरज पडली तेव्हा वापर केला आणि नंतर कोणताही विचार न करता फेकून दिलं.' हे फक्त एक वाक्य नाही तर कर्मचाऱ्याने व्यक्त केलेली भावना आहे. सध्या एका टॉयलेट पेपरवर लिहिलेला राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सिंगापूरच्या एका व्यावसायिका एंजेला योहने जेव्हा आपल्या कर्मचाऱ्याच्या राजीनामा वाचला तेव्हा ती सून्न पडली. राजीनाम्याचा फोटो तिने लिंक्डइनवर शेअर केला आहे. तेव्हा ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली.
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागे फक्त ते टॉयलेट पेपरवर लिहिलं आहे म्हणून नाही तर यामागे एक मोठा विचार आहे. या व्यक्तीला ऑफिसमध्ये मिळालेली वागणूक ही यामधून व्यक्त होते. एवढंच नव्हे तर या व्यक्तीने कामाच्या व्यापात स्वतःला आपण फक्त एक मशिन असल्याचं समजलं असेल. ही भावना खरंच त्रासदायक आहे.
कर्मचाऱ्याने यामध्ये लिहिलं आहे की, मी राजीनाम्यासाठी टॉयलेट पेपरचा वापर यासाठी केला कारण या कंपनीने माझ्यासोबत तसाच व्यवहार केला आहे. मी राजीनामा देतो. एंजेलाने अद्याप हे नाही सांगितलं की, हा खरा राजीनामा आहे की, प्रतिकात्मक फोटो आहे.
एंजेलाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपल्या कर्मचाऱ्यांशी इतके चांगले वागा की, ते कधी कंपनी सोडतील तेव्हा ते नाराज तर आभार मानतील. या राजीनाम्याने ती पूर्णपणे हादरुन गेली आहे. तिने स्वतःला एक प्रश्न विचारला की, माझी कंपनी एखाद्या व्यक्तीला फक्त त्याच्या कामाच्या स्वरुपातच ओळखते का?
'मला वाटतं की, मी टॉयलेट पेपर आहे. जेव्हा गरज पडली तेव्हा वापर केला आणि नंतर कोणताही विचार न करता फेकून दिलं.' याच कारणामुळे मी आपली नोकरी सोडत असल्याचं या राजीनाम्यात म्हटलं आहे. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याचे हे शब्द माझ्या मनाला लागले.
जर एखादी व्यक्ती कृतज्ञतेच्या भावनेने नोकरी सोडत असेल तर त्या व्यक्तीची निष्ठा कमी झाली असं नाही. तर कंपनीच्या संस्कृतीमध्ये या गोष्टीमुळे ताकदच वाढते. कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन त्यांना आपल्या कंपनीत थांबवणे ही योग्य पद्धत नाही तर त्या कर्मचाऱ्याला आपल्या कंपनीत माणूस म्हणून वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कौतुकाचे छोटे छोटे शब्द मोठे बदल करु शकता.