Marathi News> विश्व
Advertisement

कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लघवी पिण्याची आणि झुरळ खाण्याची शिक्षा

शिक्षा मिळाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा हैराण करणार निर्णय

कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लघवी पिण्याची आणि झुरळ खाण्याची शिक्षा

बिजिंग : चीनमधील एका कंपनीने आपल्या कामगारांना कामचुकारपणा केला किंवा वेळेत काम पूर्ण न केल्याने त्यांना लघवी पाजण्यात आली आणि कॉकरोच खाऊ घालण्यात आले. इतकच नाही तर त्यांना बेल्टने मारहाण देखील करण्यात आली. अनेकांना तर अशुद्ध पाणी देखील पिण्यास सांगण्यात आलं. शिवाय अशा लोकांचा पगार देखील एक महिन्यासाठी रोखण्यात आला.

सोशल मीडियावर सध्या काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सगळ्यांन समोर कंपनीने ही शिक्षा दिली. ज्या कर्मचाऱ्यांनी चमड्याची बुटं घातली नव्हती किंवा कपडे व्यवस्थित घातले नव्हते अशा कर्मचाऱ्यांना 50 युआन ($ 7.20) दंड आकारण्यात आला. स्टेट मीडियाच्या रिपोर्टनुसार अनेक कर्मचाऱ्यांनी या शिक्षेनंतर देखील कंपनीत काम करण्याची इच्छा दर्शवली. 

कंपनीच्या 3 मॅनेजर्सला 5 ते 10 दिवसांची ही शिक्षा मिळाली. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप होता. चीनमध्ये कामगारांनी स्थिती खूप वाईट आहे. चीनमध्ये कामगारांकडून जास्त काम करुन घेतलं जातं आणि त्यासाठी त्यांना मोबदला देखील कमी मिळतो.

Read More